मुंबई: भाजप खासदार नारायण राणे यांनी आज पत्रकार (journalist) परिषदेत उद्धव ठाकरे यांच्या आर्थिक समजुतीवर जोरदार टीका केली. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील नवीन सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पाच्या प्रशंसेसह राणेंनी ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. “उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्पावर टीका करण्यापूर्वी त्याचा अभ्यास करायला हवा. त्यांच्या काळातले बजेट माझ्याकडे आहे, ते वाचल्यावर समजेल की त्यांनी काय दिवे लावले,” असे राणे म्हणाले.
राणे यांनी सांगितले (journalist) की, “उद्धव ठाकरे यांना चांगल्या भाषेत बोलता येत नाही. त्यांच्या काळातील बजेट आणि आमच्या साडे चार लाख कोटींच्या बजेटची तुलना करावी. त्यांना बजेट वाचायचं असेल तर मी टिपण देईन. आमच्या सरकारने अर्थसंकल्प सादर करून लोकांना लाभ दिला आहे.”
मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या स्वबळावर लढण्याच्या निर्णयाचे स्वागत करताना राणेंनी देवेंद्र फडणवीस यांच्या मागे भाजप असल्याचे स्पष्ट केले. “फडणवीस एकटे नाहीत, त्यांच्यावर टीका करणाऱ्यांचा बोलवता धनी दुसरा आहे. जरांगे यांचे वैयक्तिक मत आहे, मराठा समाजाचे नाही,” असेही राणेंनी सांगितले.
हेही वाचा :
पावसाळी हंगाम: दुचाकीची काळजी घ्या, टाळा ‘ही’ चूक, नाहीतर…
“हिंदू महिलांनी फिगर मेन्टेन करणं सोडा, 4 मुलं जन्माला घाला”; प्रेमानंद महाराजांचं वादग्रस्त विधान
दीपिका पादुकोन आई झाल्यानंतर बाळासाठी घेणार मोठा निर्णय