बॉलिवूड अभिनेत्री नयनतारा तिच्या डॉक्युमेंट्रीमुळे (documentary)चर्चेत आहे. या डॉक्युमेंट्रीमध्ये नयनताराचा संपूर्ण प्रवास पाहायला मिळत आहे. याशिवाय तिची आणि विग्नेशची लव्ह स्टोरी देखील दाखवण्यात आली आहे. एकीकडे तिची डॉक्युमेंट्री ही वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे तर दुसरीकडे नयनताराचं खासगी आयुष्य देखील चर्चेत आहे. या डॉक्युमेंट्रीमध्ये नयनतारानं तिच्या आधीच्या रिलेशनशिपवर देखील स्पष्टपणे वक्तव्य केलं आहे. त्यासोबत त्यातून ती काय शिकली याविषयी देखील तिनं सांगितलं. तिनं खुलासा केला की तिच्या एक्स बॉयफ्रेंडनं तिला अभिनय सोडण्यास सांगितलं होतं.
नयनतारानं तिच्या या डॉक्युमेंट्रीमध्ये (documentary)सांगितलं की ‘माझं पहिलं नातं हे विश्वासावर आधारीत होतं. हा विश्वास होता की समोरची व्यक्ती तुमच्यावर प्रेम करते. रिपोर्ट्सनुसार, नयनताराचं नाव अभिनेता सिलंबरासन टीआरशी जोडलं. दोघं ‘वल्लवन’ या चित्रपटाच्या मेकिंग दरम्यान, लाइमलाइट मिळवली होती. त्यांचे काही पर्सनल फोटोज देखील ऑनलाइन लीक झाले होते. ज्यानंतर कपलनं कथितपण ब्रेकअप केला होता.’
नागार्जुननं नयनताराच्या ब्रेकअपनंतर तिची अवस्था कशी होती याविषयी सांगितलं. ‘तो तिच्या आयुष्यातील सगळ्यात कठीण काळ होता. खरंच सगळे त्यावेळी घाबरले होते. जेव्हा केव्हा नयनताराचा फोन वाजायचा, तेव्हा तिच्या चेहऱ्यावर चिंता ही दिसून यायची त्यामुळे सगळेच घाबरायचे. ती पूर्णपणे एक वेगळीच व्यक्ती झाली होती. तिच्यात खूप बदल झाले होते’, असं नागार्जुननं सांगितलं.
नयनतारानं पुढे सांगितलं की ‘मी ज्या व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये होते त्यानं मला इंडस्ट्री सोडण्यास सांगितलं आणि माझ्याकडे कोणता ऑप्शन होता असं नाही. त्यानं मला थेट त्याचा निर्णय सांगितला की मला इंडस्ट्री सोडावी लागणार. त्यामुळे मी फार दुखावले होते.’
दरम्यान, नयनतारा आणि अभिनेता आणि कोरियोग्राफर प्रभू देवा ही रिलेशनशिपमध्ये होते. त्या दोघांनी ‘विल्लू’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. तर त्याच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीनं त्याला घटस्फोट देण्यास नकार दिला होता.
हेही वाचा :
बारामतीत चाललंय काय? सांगता सभेनंतर काही तासांत युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या कंपनीवर…
IPL चॅम्पियन होण्यासाठी RCB ची मोठी रणनीती, मुंबईकरावर सोपवली महत्वाची जबाबदारी
कोल्हापूरच्या राजकारणात आता खानविलकरांची एन्ट्री