बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता यांना छोट्या पडद्यावरील(dating) अनेक कार्यक्रमांमध्ये पाहण्यात आलं आहे. गोविंदाचं विनोदाचं टायमिंग खूप कमी लोकांना माहिती आहे. गोविंदाची पत्नी सुनीतादेखील मस्ती-मजा करण्यात अग्रेसर आहे.
गोविंदासोबत थिरकण्यासाठी अनेक लोकप्रिय(dating) अभिनेत्रींचीदेखील इच्छा असते. सुनीता अहूजासोबत मात्र गोविंदा डान्स करताना दिसून आलेला नाही. गोविंदा आणि सुनीता रिअॅलिटी शोमध्ये जेव्हा एकत्र दिसू लागले त्यानंतर त्यांची जोडी गाजली. गोविंदा आणि सुनीताचा बॉन्ड खूपच कमाल आहे.
गोविंदा आणि सुनीताचे दोन मुलं आहेत. स्टेट्स क्वीन नामक इंस्टाग्राम हँडलने जोडप्याचे अनसीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. लग्नाच्या सुरुवातीच्या फोटोंमध्ये तरुण गोविंदा दिसून येत आहे. तर सुनीता कॉलेजमध्ये जाणारी तरुण मुलगी दिसत आहे, फोटोमध्ये दोघेही खूप आनंदी दिसत आहेत. काही फोटोंमध्ये गोविंदाची मुलगीदेखील दिसत आहे. काही फोटो खास ओकेजनचे आहेत. यात जोडप्याचा ट्रेडिशनल अंदाज पाहायला मिळत आहे.
गोविंदाने स्वत: कपिल शर्मा कॉमेडी शोमध्ये आपल्या रिलेशनबद्दल भाष्य केलं. त्यावेळी गोविंदा म्हणाला की, गोविंदाची पत्नी सुनीताची मोठी बहिण त्याची मामी लागते. तिचं नाव अनीता असून ती गोविंदाचे मामा आनंद सिंह यांची पत्नी आहे. स्ट्रगलच्या तीन वर्षांत गोविंदा आपल्या मामाच्या घरी राहत असे. तिथे सुनीताचं खूप येणं-जाणं होतं. त्यावेळी एकमेकांना भेट असताना ते एकमेकांच्या प्रेमात पडले. पुढे 11 मार्च 1878 मध्ये ते लग्नबंधनात अडकले.
गोविंदाने सुनीता आहूजासोबत गुपचूप लग्न केलं होतं. लग्नामुळे आपल्या करिअरवर परिणाम होईल असं त्याला वाटत होतं. त्यामुळे 1 वर्ष त्याने लग्न झाल्याचं सर्वांपासून लपवून ठेवलं. टीनाच्या जन्मानंतर गोविंदाने सुनीतासोबत लग्न झाल्याचं कबुल केलं. अभिनेत्याने स्वत: एका मुलाखतीत ही गोष्ट सांगितली होती. गोविंदाने बॉलिवूडच्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे.
हेही वाचा :
‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’ मध्ये भारतीय रील स्टारचा जलवा
मुसळधार पावसामुळे खेळ थांबला, चाहते नाराज
कारखान्यांच्या जादा उत्पन्नातील पैसे शेतकऱ्यांना देण्यासाठी वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजूरी द्यावी