IPL मध्ये नवा ट्विस्ट! 18 व्या मोसमाआधी बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय

इंडियन प्रीमियर लीग च्या 18 व्या मोसमाला अवघे काही तास उरले असतानाच एक मोठी बातमी समोर आली आहे. बीसीसीआय(BCCI) डे-नाईट सामन्यांमध्ये 3 चेंडूंचा वापर करण्याच्या नव्या नियमावर विचार करत आहे. यंदाच्या मोसमात हा नवा प्रयोग राबवला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

IPL 2025 मोसमाची सुरुवात 22 मार्चपासून होत असून, 10 संघांचे कर्णधार एका विशेष कार्यक्रमात सहभागी झाले होते. ‘कॅप्टन मीट’ या कार्यक्रमात नव्या नियमांवर चर्चा झाली. यावेळी 3 चेंडूंच्या वापराबाबत सकारात्मक संकेत मिळाले आहेत, मात्र याबाबत बीसीसीआयने(BCCI) अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही.

डे-नाईट सामन्याच्या पहिल्या डावात 1 चेंडू वापरण्यात येईल. दुसऱ्या डावात 11 व्या ओव्हरनंतर नवीन चेंडू दिला जाईल. यामागील प्रमुख कारण म्हणजे मैदानावर रात्री पडणाऱ्या दवाचा परिणाम. अनेक वेळा टॉस जिंकणाऱ्या संघाला या ड्यू फॅक्टरचा मोठा फायदा मिळतो.

बीसीसीआयनुसार, नव्या चेंडूचा वापर केल्यामुळे सामना अधिक बरोबरीचा होईल आणि टॉसचा परिणाम मर्यादित राहील. बॉलिंग करणाऱ्या संघासाठी ही बाब काहीशी फायद्याची ठरू शकते, असंही बोललं जातं आहे.

हा निर्णय अंतिम झाल्यास, दुसऱ्या डावात गोलंदाजांना नवा चेंडू वापरावा लागेल. त्यामुळे फिरकी गोलंदाजांना अडचण येऊ शकते, कारण नवीन चेंडूने फिरकीला फारशी मदत मिळत नाही. त्यामुळे अनेक तज्ज्ञांनी या नव्या नियमानं बॅलन्स बिघडू शकतो, असा अंदाज वर्तवला आहे.

बीसीसीआय याबाबत लवकरच अधिकृत घोषणा करणार असल्याचे संकेत आहेत. या नव्या नियमानुसार सामना अधिक निष्पक्ष होईल, की नव्या वादांना जन्म मिळेल, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. IPL 2025 च्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये याचा प्रयोग होतो की नाही, हे लवकरच स्पष्ट होईल.

हेही वाचा :

मार्चचा शेवटचा आठवडा गेमचेंजर ठरणार! ‘या’ 3 राशींचा गोल्डन टाईम सुरू

प्रियकरासह समुद्राच्या लाटा पाहण्यासाठी आली होती प्रेयसी, पण… Video Viral

‘खल्लासच करतो’ म्हणत तरुणाला बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल