जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथे प्रसिद्ध रीलस्टार विक्की पाटील याच्या (sensational)हत्येची धक्कादायक घटना घडली. विक्कीच्या वडिलांनीच त्याची हत्या करून आत्महत्या केल्याचे समोर आले होते, पण आता या प्रकरणात एक नवीन ट्विस्ट आला आहे. विक्कीच्या पत्नीने केलेल्या आरोपांमुळे एकच खळबळ उडाली आहे.

विक्की पाटीलच्या पत्नीने असा दावा केला आहे की, “माझ्या सासऱ्यांना शर्टाचे बटणही लावता येत नव्हते, त्यामुळे त्यांनी माझ्या पतीची हत्या केलेली नाही. माझ्या पतीची हत्या सासऱ्यांनी नाही, तर त्यांच्या काकांनी केली आहे.” या आरोपामुळे प्रकरणाला नवीन वळण मिळाले आहे.दुसरीकडे, विक्की पाटीलच्याआईने मात्र आपल्या पतीनेच मुलाचा खून करून आत्महत्या केल्याचे सांगितले आहे. त्यामुळे, या हत्याकांडाचा (sensational)तपास करणे पोलिसांसमोर मोठे आव्हान बनले आहे. माजी सैनिक असलेल्या विठ्ठल पाटील यांनी आपल्या मुलाची हत्या केल्यानंतर स्वतः गळफास लावून घेतला, पण यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मुलगा विक्की पाटील दारू पिऊन मारहाण करत असल्यामुळे विठ्ठल पाटील यांनी त्याची हत्या केली आणि नंतर स्वतःचे जीवन संपवले, असे विठ्ठल यांच्या पत्नी आणि विक्कीची आई संगीता पाटील यांनी सांगितले आहे. सततच्या छळाला कंटाळून हे टोकाचे पाऊल उचलल्याचे त्यांनी सांगितले.(sensational)आता या हत्याकांडाचा तपास करताना पोलिसांनाअनेक प्रश्नांची उत्तरे शोधावी लागणार आहेत. विक्कीच्या पत्नीने केलेले आरोप, आईने दिलेली माहिती आणि इतर पुरावे यांच्या आधारे सत्य काय आहे हे शोधावे लागेल.
हेही वाचा :
चॅम्पियन ट्रॉफी सुरु असताना पाकिस्तानात बॉम्बस्फोट
मेट्रो स्टेशनवर खुल्लमखुल्ला रोमान्स जोडप्याचा किस करतानाचा VIDEO व्हायरल
पत्नीने छळ केल्यामुळे TCS मॅनेजरने संपवलं जीवन video viral