‘राऊडी ऑफ सँडलहूड’ म्हणून ओळखला जाणारा(mystery)कन्नड अभिनेता दर्शन याला मंगळवारी (11 जून) एका हत्येप्रकरणी पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रेणुका स्वामीच्या हत्येप्रकरणी दर्शनला अटक करण्यात आली आहे. अभिनेत्री पवित्रा गौडा हिला अक्षेपार्ह मेसेज पाठवण्याचा रेणुका स्वामीवर आरोप होता. आता रेणुका स्वामीच्या हत्येप्रकरणी म्हैसूर येथील फार्महाऊसमधून दर्शनला अटक करण्यात आल्याचे म्हटलं जात आहे.
कर्नाटकातील चित्रदुर्ग येथील रहिवासी(mystery) असलेल्या रेणुका स्वामीनं अभिनेत्री पवित्रा गौडाला अश्लील मेसेज पाठवले होते. पवित्रा गौडाचे दर्शनाचे अफेअर आहे, असे म्हटलं जात आहे. 8 जून रोजी रेणुकाची हत्या करण्यात आली होती आणि 9 जून रोजी तिचा मृतदेह सापडला होता. रेणुकानं आत्महत्या केल्याचा संशय सुरुवातीला पोलिसांनी व्यक्त केला होता, मात्र तपासात तिची हत्या झाल्याचे उघड झाले.
रिपोर्टनुसार, तपासादरम्यान, दर्शनने दिलेल्या सूचनेनुसार रेणुकाची हत्या झाल्याचे पोलिसांना आढळून आले. राजराजेश्वरी नगरमधील दर्शनचा जवळचा सहकारी विनयच्या गॅरेजमध्ये दर्शनासमोर रेणुका मारल्या गेल्याचेही अनेक अहवालात म्हटले गेले आहे. त्यानंतर तिचा मृतदेह नाल्यात फेकून देण्यात आला.
दर्शनासह अन्य 10 जणांविरुद्ध पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली, त्यांनाही अटक करण्यात आली आहे. द डेव्हिल या आगामी प्रोजेक्टच्या शूटिंगसाठी दर्शन हा म्हैसूरमध्ये होता.
दर्शन हा ज्येष्ठ कन्नड अभिनेते थुगुदीपा श्रीनिवास यांचा मुलगा आहे. त्याने 2001 मध्ये मॅजेस्टिक या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. कटेरा, गराडी, क्रांती, रॉबर्ट, इन्स्पेक्टर विक्रम, चक्रवर्ती, तारक, नागरहावू यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्यानं काम केलं आहे.
हेही वाचा :
कांदा शेतकऱ्यांना हसवणार, ग्राहकांना रडवणार; ईदपूर्वी दरात तब्बल 50 टक्क्यांनी वाढ!
‘शिखांनी तुमच्या आया-बहिणींना वाचवलंय…’ पाकिस्तान खेळाडूच्या ‘त्या’ जोकवर हरभजनचा फिरला दांडपट्टा
सांगली हादरलं! हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या कोल्हापुरातील तरुणाचा सांगलीत निर्घृण खून