GBS म्हणजेच गुलियन बॅरे सिंड्रोमचा कहर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. कोरोनाप्रमाणेच हा GBS व्हायरस(virus) आता जीवघेणा ठरत आहे. महाराष्ट्रात केवळ नवीन रुग्णच आढळत नाहीत तर या आजारामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या देखील वाढताना दिसत आहे.

महाराष्ट्रात शुक्रवारी GBS व्हायरसने(virus) आणखी दोन बळी घेतले आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये गुलियन बॅरे सिंड्रोममुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे, तर पुण्यातही याच व्हायरसने आणखी एकाचा बळी गेला आहे. पिंपरी-चिंचवडमधील मृताचे वय 36 वर्षे होते. अशा प्रकारे, महाराष्ट्रात आतापर्यंत या GBS व्हायरसमुळे चार जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्यात GBS व्हायरसचे सर्वाधिक रुग्ण आहेत. आतापर्यंत पुण्यात GBS व्हायरसचे 130 रुग्ण आढळून आले आहेत.
याआधी, गुरुवारी पुण्यातच GBS व्हायरसमुळे एका महिलेचा मृत्यू झाला होता. गुरुवारी झालेला हा GBS व्हायरसमुळे झालेला दुसरा मृत्यू होता. याआधी या व्हायरसमुळे मृत्यूमुखी पडलेला पहिला रुग्ण पुरुष होता. GBS चे पूर्ण नाव गुलियन-बॅरे सिंड्रोम आहे. या व्हायरसने पुण्यात खळबळ उडवून दिली असून त्याचा कहर सतत वाढत आहे.
या पार्श्वभूमीवर, नागरिकांनी घाबरून न जाता आवश्यक ती खबरदारी घ्यावी. विशेषतः हात स्वच्छ धुणे, खोकताना किंवा शिंकताना तोंडावर रुमाल ठेवणे यासारख्या गोष्टींचे काटेकोरपणे पालन करावे.
24 जानेवारी रोजी, राज्य आरोग्य विभागाने रॅपिड रिस्पॉन्स टीम स्थापन केली, जेणेकरून संक्रमणाच्या प्रकरणांमध्ये अचानक झालेल्या वाढीची चौकशी करता येईल. सुरुवातीलाच संसर्गाची 24 संशयित प्रकरणे समोर आली होती. दरम्यान, RRT आणि PMC च्या आरोग्य विभागाने सिंहगड रोड परिसरातील बाधित भागात देखरेख सुरू ठेवली आहे.
एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, एकूण 7,215 घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये पुणे महानगरपालिका हद्दीतील 1,943 घरे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील 1,750 घरे आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील 3,522 घरांचा समावेश आहे. या सर्वेक्षणातून महत्त्वाची माहिती गोळा करून पुढील उपाययोजना आखण्यास मदत होईल.

GBS हा एक दुर्मिळ आजार आहे ज्यामध्ये शरीराचे अवयव अचानक सुन्न होतात आणि स्नायूंमध्ये अशक्तपणा येतो. यासोबतच या आजारात हात आणि पायांमध्ये तीव्र अशक्तपणा येणे अशी लक्षणे देखील दिसतात. डॉक्टरांनी सांगितले की सामान्यतः जिवाणू आणि विषाणूजन्य संसर्ग GBS चे कारण बनतात कारण ते रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करतात.
GBS हा एक गंभीर आजार असून नागरिकांनी या आजाराबाबत जागरूक राहणे गरजेचे आहे. कोणतीही लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
हेही वाचा :
शिंदे गटाच्या नेत्याला धक्का! अपक्ष उमेदवाराकडून कोर्टात धाव
‘स्क्विड गेम ३’ ची रिलीज डेट जाहीर; जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येईल ही वेब सिरीज!
“53 दिवसांपासून संकट, मला जाणूनबुजून टार्गेट केलं, माझा राजीनामा..”, धनंजय मुंडेही आक्रमक