भारताच्या नोकरदार वर्गाने कर्ज (loan)घेण्याच्या प्रवृत्तीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे, अशी माहिती एका नवीन सर्वेक्षणातून समोर आली आहे. सध्या देशभरात नोकरी करणाऱ्या लोकांमध्ये २५ लाखांहून अधिक किमतीचं कर्ज घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत या आकड्यात लक्षणीय वाढ झाली आहे, ज्यामुळे आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी कर्जाचा वापर अधिक प्रमाणात केला जात असल्याचे स्पष्ट होते.
सर्वेक्षणानुसार, 2022 मध्ये 19% नोकरदारांकडे कर्ज(loan)नव्हतं, परंतु सध्याच्या घडीला हा आकडा 13.4% पर्यंत खाली आला आहे. म्हणजेच, 91.2% नोकरदारांनी कोणत्या ना कोणत्या कारणासाठी कर्ज घेतल्याची माहिती मिळाली आहे. विशेषतः महिला वर्गाने गृहकर्ज घेण्यास प्राधान्य दिले आहे.
सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 1529 व्यक्तींच्या मधील 40% महिलांनी कर्जाची गरज व्यक्त केली आहे. 22 ते 27 वर्षे वयोगटातील तरुणांना नव्या तंत्रज्ञानाची चांगली माहिती असून, ते डिजिटल व्यवहारासाठी प्राधान्य देत आहेत. याशिवाय, 28 ते 34 वर्षे वयोगटातील लोक प्रवास आणि खासगी वाहनांच्या खरेदीसाठीही कर्ज घेण्यात उत्सुक आहेत.
आर्थिक गरजांवर लक्ष केंद्रित करताना, नोकरदार वर्ग कर्जाच्या माध्यमातून आपले स्वप्न पूर्ण करण्यास आणि त्यांच्या आवश्यकतांवर नियंत्रण ठेवण्यास प्रयत्नशील आहे. तथापि, कर्जाची परफेड करताना अनेकांना आर्थिक ताण आणि चिंता भासत असल्याचे या सर्वेक्षणात दिसून आले आहे.
हेही वाचा :
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची धुरा विराटच्या खांद्यावर
कोल्हापुरात टेम्पो-दुचाकीत भीषण अपघात; पतीचा जागीच मृत्यू तर पत्नी…
पेट्रोल आणि डिझेल ५ रुपयांनी स्वस्त होणार? पेट्रोलियम मंत्र्यांकडून दिवाळीचं मोठ गिफ्ट