पुढील 24 तास धोक्याचे, IMD कडून ‘या’ जिल्ह्यांसाठी महत्वाचा इशारा

राज्यात सध्या अनेक ठिकाणी पावसाचा(rain) जोर वाढला आहे. गेल्या दोन आठवड्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे उभी पिकं आडवी झाली आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाल्याचे दिसून आले. हवामान विभागाने आजही अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.

आज कोकणासह काही भागात मुसळधार पावसाची(rain) शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात देखील घाट माथा परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे.त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलाय. विदर्भ आणि मराठवाड्यात देखील जोरदार पाऊस पडेल.

आज विदर्भातील, अकोला, अमरावती, नागपूर, बुलढाणा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह उपनगरातही आज पावसाची शक्यता आहे. मुंबईत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल.

मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, बीड , लातूर आणि धाराशीव येथे देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. येथे कोणताही अलर्ट देण्यात आला नाही. हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुणे, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात पावसाचा जोर वाढू शकतो.9 सप्टेंबरपर्यंत पाऊस कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने म्हटलं आहे.

मागील आठवड्यात पडलेल्या पावसामुळे सर्वाधिक फटका हा मराठवाडा आणि विदर्भाला बसला येथे. येथे प्राथमिक आकडेवारीनुसार साडेनऊ हजार हेक्टरवर शेतजमिनीचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. वाशिम, बुलढाणा आणि अकोला या तीन ठिकाणी सर्वाधिक फटका शेतीला बसला आहे. अजूनही पावसाचा जोर वाढणार असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

हेही वाचा:

मोठी बातमी! जितेंद्र आव्हाडांविरोधात गुन्हा दाखल

खाणं-पिणंही झालं अशक्य! कर्करोगाशी झुंज देणाऱ्या हिना खानला आणखी एक आजार

मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याचा हट्ट का? ठाकरे गटाने नेमके काय साध्य केले… राजकीय वर्तुळात चर्चा