राज्यातील अनेक भागांमध्ये गेल्या दोन दिवसांमध्ये पावसाने जोरदार (districts)हजेरी लावली आहे. मुंबईतही मध्यरात्रीपर्यंत पावसाच्या जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांची उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. दरम्यान, येत्या ३-४ तासांत महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळणार अशा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यापार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे.
राज्यामध्ये मान्सूनचा जोर वाढणार असून अनेक जिल्ह्यांमध्ये(districts) ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुणे, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गाला पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.
तर पुणे शहराजवळच्या घाटमाथ्यावर सोमवारी (ता. १०) मुसळधार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ हवामान खात्याने रविवारी दिला आहे. कोकणासह, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दक्षिण भागात मॉन्सूनच्या पावसाने जोर धरला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर सोमवारी मुसळधार पावसाचा ‘रेड अलर्ट,’ तर ठाणे, रायगड, रत्नागिरी, जिल्ह्यांसह पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ हवामान विभागाने वर्तविला आहे.
मराठवाडा आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांच्या स्थिती तयार झाली आहे. महाराष्ट्राच्या दक्षिण भागात वाऱ्यांचे पूर्व-पश्चिम जोडक्षेत्र सक्रिय आहे. कोकणासह, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा जोर वाढू लागला आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यांत अनेक ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. राज्याच्या काही भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत. उर्वरित राज्यात ढगाळ हवामान आणि उकाडा कायम आहे. दुपारनंतर मेघगर्जनेसह पाऊस हजेरी लावत आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. सोमवारी कोकणातील सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जिल्ह्यात मुसळधार, तर कोकणासह पुणे व सातारा जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा आहे. तर, उर्वरित राज्यात वादळी वारे, विजांसह पूर्वमोसमी पावसाचा इशारा कायम असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
पुण्याला शनिवारी मुसळधार पावसाने झोडपल्यानंतर रविवारी सुट्टीच्या दिवशी दिवसभर पावसाने विश्रांती घेतली. मात्र, सायंकाळी साडेआठनंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली होती. आद्रतेचे प्रमाणही वाढलेले होते. त्यामुळे कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा ५ अंश सेल्सिअसने कमी होऊन २९.२ अंश सेल्सिअस नोंदला. पुण्यात १ ते ९ जून या दरम्यान पुण्यात २०९.२ मिलिमीटर पाऊस पडला. या दरम्यान, पुण्यात ४९.७ मिलिमीटर पाऊस पडतो. या सरासरीच्या तुलनेत १५९.५ मिलिमीटर जास्त पावसाची नोंद झाली.
मुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) – कोल्हापूर
जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) – पुणे, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, ठाणे, रायगड
वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) – मुंबई, पालघर, नाशिक, नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, लातूर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.
कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील(districts) अनेक जिल्ह्यांत आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अहमदनगर, नाशिक, जळगावात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर मराठवाड्यातील, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, धाराशिव, नांदेडसह परिसराला पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे.
विदर्भातील, बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, भंडारा जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे.
हेही वाचा :
जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीत बस दरीत कोसळली 10 जणांचा मृत्यू
NDA च्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांची यादी पाहा..
अब्दुल सत्तार यांची काँग्रेसशी जवळीक; आघाडीच्या उमेदवाराणा घरी जाऊन भेट