राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. सर्वच पक्ष रिंगणात उतरले असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही मागे राहिली नाही. अशातच राज्याचा पुढचा मुख्यमंत्री(Minister) कोण होणार? याबाबतच्या चर्चा सुरु असतानाच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी यांनी भुवया उंचावणारं विधान केलंय.
पुढचा मुख्यमंत्री(Minister) भाजपचा होणार असून 2029 चा मुख्यमंत्री मनसेचा होणार असल्याचं राज ठाकरेंनी स्पष्ट केलंय. त्यामुळे आता यंदाच्या निवडणुकीनंतर भाजप-मनसे सत्ता स्थापन करणार असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला होता, तर आता विधानसभा निवडणुकीला राज ठाकरेंनी आपले 100 शिलेदार मैदानात उतरवले आहेत. एकीकडे महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये लढत सुरु आहे तर वंचित बहुजन आघाडीसह तिसरी आघाडी आणि आता मनसेदेखील मैदानात उतरली आहे.
राज ठाकरे पुढे बोलताना म्हणाले, मी शिवसेनेत असताना पक्ष फोडला नाही, मी पक्षातून बाहेर पडलो. मला पक्ष फोडून पक्ष निर्माण करायचा नव्हता. त्यावेळी शक्य असूनही मी आमदार फोडले नाहीत. आता सत्तेत येण्यासाठी वेळ लागला तरीही चालेल पण फोडाफोडी करुन मला सत्ता नकोयं. महाराष्ट्र खूप मोठा असून आत्ताच्या परिस्थितीतून महाराष्ट्र बाहेर येणार असल्याचं राज ठाकरेंनी स्पष्ट केलंय.
राज ठाकरे यांचे सुपूत्र अमित ठाकरे पहिल्यांदाच माहिम विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. अमित ठाकरेंना भाजपने पाठिंबा दिलायं. त्यावर बोलताना ठाकरे म्हणाले, अमितविरोधात उमेदवार देणे हा स्वभावाचा भाग आहे. प्रत्येक व्यक्ती आपल्या स्वभावानूसार वागत असतो. ही गोष्ट भाजपसारख्या मॅच्युअर्ड पक्षांना समजू शकते पण सर्वांना कळेच असं नाही. इतरांचंही जे मिळेल ते ओरबाडण्याचे प्रयत्न सुरु असल्याचं राज ठाकरेंनी स्पष्ट केलंय.
शिवसेेनेत असताना माझ्या आयुष्यात किंवा माझ्याशी संबंध आलेला दुसरा पक्ष म्हणजे भाजप आहे. शिवसेनेत होतो तेव्हा माझा भाजपचे नेते प्रमोद महाजन, नितीन गडकरी, गोपीनाथ मुंडे, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांच्याशी थेट संबंध आला आहे. माझ्या आयुष्यात माझ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी भेटीगाठी झाल्या आहेत, पण संबंध कधीच आलेला नसल्याचं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलंय.
हेही वाचा :
लाज वाचवण्यासाठी रोहित घेणार मोठा निर्णय
मोमोज खाल्ल्याने महिलेचा मृत्यू!
झोपेत असताना तीन महिलांसह पाच जणांची हत्या; ‘तो’ हत्यार घेऊन आला अन्…