‘इलेक्ट्रिक वाहन निर्मितीपासून 5 कोटी रोजगार..’ नितीन गडकरींचा दावा

10 सप्टेंबर रोजी आयोजित सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल(vehicle) मॅन्युफॅक्चरर्स च्या वार्षिक परिषदेला पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हजेरी लावली. यावेळी आगामी काळात भारत हा इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन केंद्र बनेल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच इलेक्ट्रिक वाहन निर्मितीमधून ५ कोटी रोजगार निर्माण होतील, असाही दावा यावेळी नितीन गडकरी यांनी केला.

सियामच्या वार्षिक परिषदेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोटार वाहन निर्मिती उद्योगाच्या प्रतिनिधींना जागतिक स्तरावर अवलंबलेल्या पद्धती भारतामध्ये आणण्यास सांगितले तसेच त्यांना हरित आणि स्वच्छ वाहतुकीवर काम करण्यााचाही सल्ला दिला. ऑटोमोटिव्ह उद्योग आर्थिक विकासाला अधिक चालना देईल. 2047 पर्यंत विकसित भारताच्या ध्येयाकडे आपण वाटचाल करत आहोत, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.

त्याचवेळी केंद्रीय रस्ते वाहतूक(vehicle) आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनीही भारत इलेक्ट्रिक वाहन निर्मितीचे केंद्र बनेल, असा विश्वास व्यक्त केला. भारताचे इलेक्ट्रिक वाहन 2030 पर्यंत वार्षिक 10 दशलक्ष युनिट्सपर्यंत पोहोचू शकते. 2030 पर्यंत भारतीय ईव्ही बाजाराची क्षमता 20 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे, ज्यामुळे ५ कोटी रोजगार निर्माण होतील, असा आशावाद नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. तसेच लिथियम-आयन बॅटरीची किंमत आणखी कमी होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे अर्थव्यवस्थेला मदत होईल, असेही नितीन गडकरी म्हणाले.

तसेच अर्थमंत्र्यांनी इलेक्ट्रिक वाहनांवर सबसिडी दिल्याने मला कोणतीही अडचण नाही. ईव्ही उत्पादकांना यापुढे अनुदानाची गरज नाही कारण त्यांचा उत्पादन खर्च कमी झाला आहे आणि ग्राहक आता इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय निवडत आहेत. गेल्या वर्षी, भारतातील इलेक्ट्रिक वाहनांचा बाजार हिस्सा 6.3 टक्के होता, जो मागील वर्षाच्या तुलनेत 50 टक्के अधिक आहे, असे म्हणत दोन वर्षांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती पेट्रोल कारएवढ्या होतील, असे मोठे विधानसही नितीन गडकरी यांनी केले.

हेही वाचा:

अजित दादा पवार म्हणतात इच्छा माझी पुरी करा….!

अजितदादा बारामती मतदारसंघातून निवडणूक लढवायला घाबरतायेत, कारण…;

देशातील दोन बड्या बँकांना RBI चा दणका, कोट्यावधी रुपयांचा दंड, ग्राहकांवर काय होणार परिणाम?