नाईलाज! स्वत:लाच मतदान करू शकणार नाहीत फडणवीस, ठाकरे; पण असं का?

आज महाराष्ट्रात मतदान पार पडत आहे. विधानसभेच्या (Assembly)288 जागांसाठी आज मतदान होत आहे. आज सकाळी सात वाजल्यांपासून नागरिकांनी मतदान केंद्रांवर रांगा लावल्या आहेत. राज्यात मतदानाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. तर, सर्वसामान्य नागरिकांसह राजकीय नेतेही आज सकाळपासूनच मतदानासाठी केंद्रावर पोहोचले आहेत. मात्र राज्यातील असे काही नेते आहेत ते स्वतःसाठीचं मतदान करु शकणार नाहीत.

राज्यभरात मतदान होत असताना अनेक मंत्र्यांसह बडे नेते स्वतःसाठीच मतदान करु शकणार नाहीत. (Assembly)उमेदवारी एका मतदारसंघात तर मतदान मात्र दुसऱ्या ठिकाणी असल्याने त्यांना स्वतःसाठी मतदान करता येणार नाही.

हे नेते मतदानापासून वंचित राहणार 

नाव उमेदवारी कुठेमतदान कुठे
देवेंद्र फडणवीस नागपूर दक्षिण पश्चिमनागपूर पश्चिम
विकास ठाकरे         नागपूर पश्चिम             नागपूर दक्षिण पश्चिम
बाळासाहेब थोरात     संगमनेर                शिर्डी
आदित्य ठाकरे   वरळी      वांद्रे पूर्व
सुधीर मुनगंटीवार  बल्लारपूर  चंद्रपूर 
विजयकुमार गावित    नंदुरबार  नवापूर
आदिती तटकरेश्रीवर्धन  पेण
मिलिंद देवरा   वरळीमलबार हिल
रोहित पवारकर्जत जामखेडबारामती
नवाब मलिक मानखुर्द, शिवाजीनगरकलिना
हीना गावित    अक्कलकुवा   नंदुरबार
ययाती नाईक कारंज पुसद
निलेश राणे    कुडाळ   कणकवली
धीरज देखमुख      लातूर ग्रामीण  लातूर शहर
झिशान बाबा सिद्दीकी  वांद्रे पूर्ववांद्रे पश्चिम
इम्तियाज जलील औरंगाबाद पूर्वऔरंगाबाद मध्य 
संतोष बांगरकळमनुरीहिंगोली
जितेंद्र मोघेआर्णी दिग्रेस
अभिजित अडसूळदर्यापूर कांदिवली
मीनल खतगावकरलोहा देगलूर
आशिष देखमुख  सावनेर नागपूर पश्चिम
विजय अग्रवालअकोला पश्चिम  अकोला पूर्व
सतीश चव्हाण गंगापूरऔरंगाबाद (पश्चिम)
गोपीचंद पडळकर जत खानापूर
अमल महाडिक कोल्हापूर दक्षिणहातकणंगले
केदार दिघे कोपरी पाचपाखाडीओवळा माजिवडा
वैभव नाईक कुडाळकणकवली
विनोद शेलार मालाड पश्चिमकांदिवली पूर्व
शायना एनसी मुंबादेवीमलबार हिल
अशोक उईके राळेगावयवतमाळ
विजयकुमार देशमुख   सोलापूर शहर उत्तरसोलापूर शहर मध्य
 सुभाष देशमुख   सोलापूर दक्षिणसोलापूर शहर मध्य

हेही वाचा :

‘…तेव्हा असे प्रकार होतात’; तावडे पैसे वाटप प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले

मोठी बातमी! शरद पवार गटाच्या नेत्याच्या गाडीवर हल्ला

“माझ्यावरती अन्याय झाला…”, तेजस्विनी पंडीतकडून राज ठाकरेंचा ‘तो’ व्हिडीओ शेअर