बदलापूर रेल्वे स्थानकात एक धक्कादायक प्रकार घडलाय. एका प्रवाशाने रेल्वे (toilet)स्थानकावरील शौचालयाचा वापर केला, परंतु शौचालय चालकास देण्यासाठी त्याच्याकडे पाच रूपये नव्हते. यामुळे संतापलेल्या शौचालय चालकाने प्रवाशाच्या डोळ्यात अॅसिड फेकलंय. याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल करत अधिक तपास सुरू केलाय.
याबाबत सविस्तर वृत्त असं की, रेल्वे स्थानकातील शौचालयाचमध्ये (toilet)गेलेल्या एका २८ वर्षीय युवकाने ५ रुपये सुट्टे नसल्याचं बोलताच शौचालय चालक आणि त्याच्या १५ वर्षीय अल्पवीयन मुलाने त्या तरुणाला बेदम मारहाण केली. त्याच्या चेह्राऱ्यावर (अॅसिड ) बाथरूम क्लिनर द्रव फेकून डोळयाला गंभीर दुखापत केलीय. ही घटना बदलापूर रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीन वर असलेल्या शौचालयात ही घडली आहे.
याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी शौचालय चालक योगेशकुमार चंद्रपालसिंग (वय ४७ ) याला अटक केलीय, तर त्याच्या १५ वर्षीय अल्पवीयन मुलाला ताब्यात घेतलं आहे. रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी योगेशकुमार हा बदलापूर रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीन वरील शौचालय चालवणारा ठेकेदार आहे. तर तक्रारदार विनायक बाविस्कर हे बदलापूर पश्चिम भागातील गोकुळधाम कॉप्लेक्समध्ये कुटूंबासह राहत आहे.
विनायक बाविस्कर १९ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास बदलापूर स्थानकातील शौचालयाचमध्ये गेला होता. बाहेर आल्यानंतर आरोपी बाप-लेकाने विनायककडे शौचालयाचा वापर केल्याबद्दल ५ रुपयाची मागणी केली. मात्र, विनायककडे सुट्टे ५ रुपये नसल्याने त्याने नकार दिला. त्यामुळं वाद होऊन आरोपी बाप-लेकानी मिळून त्याला बेदम मारहाण केली.
१५ वर्षीय अल्पवयीन मुलाने विनायकच्या चेहऱ्यावर बाथरूम साफ करण्यासाठी असलेलं अॅसिड फेकलं. या हल्ल्यात त्याच्या डोळ्याला गंभीर इजा झालीय. त्याचावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच कल्याण लोहमार्ग पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करत आरोपी बाप लेकाला ताब्यात घेतलंय.
हेही वाचा :
महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २६ नोव्हेंबरपूर्वी ; निवडणूक आयोगाचा स्पष्ट निर्णय
मनोज जरांगे पाटील यांचा भाजपावर हल्ला; २०२४ मध्ये भाजपाला मोठा फटका बसणार असल्याचा इशारा
पावसाच्या पुनरागमनाची धडाकेबाज सुरुवात; कोकण, विदर्भासह राज्याच्या अनेक भागांत मुसळधार पावसाची शक्यता!