राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक असलेल्या शरद पवार यांच्या कन्या तसेच राष्ट्रवादी काँग्रेस(politics) शरदचंद्र पवार गटाचे लोकसभा खासदार सुप्रिया सुळे यांचा फोन आणि व्हॉट्सअप हॅक झालं आहे. त्यांनीच आपल्या अधिकृत एक्स (आधीचं ट्वीटर) अकाऊंटवरुन यासंदर्भातील माहिती दिली आहे. तसेच कोणीही मला फोन अथवा मेसेज करु नका असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
सुप्रिया सुळेंच्या अधिकृत एक्स अकाऊंटवरुन(politics) दुपारी एक वाजता करण्यात आलेल्या पोस्टमध्ये त्यांनी, “अत्यंत महत्वाचे” असं म्हणत मोबाईल हॅक झाल्याची माहिती दिली आहे. “माझा फोन आणि व्हॉटस्अप हॅक झाले आहे. कोणीही मला मेसेज किंवा फोन करून नये. याबाबत मी पोलीस तक्रार करत आहे. कृपया याची नोंद घ्यावी,” असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.
हेही वाचा :
सांगलीत आज ओबीसी आरक्षण बचाव महाएल्गार मेळावा
महाराष्ट्र अशांत केला जातोय केवळ हेतू साध्य करण्यासाठी
“माझ्या त्या गरजा खूपच कमी झाल्या आहेत”, प्राजक्ता माळीचा सर्वात मोठा खुलासा!