आता पुण्यातील शाळेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

बदलापूर पाठोपाठ आता पुण्यातील नामांकित शाळेत धक्कादायक(school) प्रकार घडला आहे. अल्पवयीन मुलीवर शाळेतील विद्यार्थ्यानेच अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पुण्यातील भवानी पेठ परिसरात असलेल्या एका नामांकित शाळेत हा प्रकार घडला आहे. बंगला, बदलापुर, कळवा पाठोपाठ आता पुण्यातील या धक्कादायक प्रकाराने पुन्हा एकदा महिला आणि खास करुन लहान मुली सुरक्षित आहेत का? असा प्रश्न विचारला जात आहे.

धक्कादायक बाब म्हणजे 15 ऑगस्टच्या दिवशीच हा प्रकार घडला. पीडित मुलगी ही सातवीच्या वर्गात(school) शिकणारी असून हा आरोपी तरुण देखील त्याच शाळेतील विद्यार्थी आहे. 19 वर्षीय देवराज पदम आग्री असे आरोपी तरुणाचे नाव आहे. या तरुणाने शाळेतील स्वच्छतागृहात लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे.

समर्थ पोलीस ठाण्यात देवराज आग्री विरोधात गुन्हा दाखल असून त्याला अटक ही करण्यात आली आहे. पीडित मुलीच्या 30 वर्षीय आईने या प्रकरणी तक्रार दिली आहे. तसेच शाळेतील स्वच्छतागृहाजवळ हा प्रकार घडल्याच उघड झालं आहे. या तरुणावर समर्थ पोलीस ठाण्यात याप्रकरणी आरोपी विरोधात 74, 75 (1) (i) पोक्सो 8 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाराष्ट्र्रात लाजीरवाणा हा प्रकार घडला आहे. विद्यार्थी हे शाळेतही सुरक्षित नसेल तर हा सर्वात मोठा प्रश्न आहे. शाळांमधूनच असे प्रकार घडत आहेत, त्यामुळे मुलं शाळेत तरी सुरक्षित आहेत का? असा प्रश्न विचारण्यात येत आहे. तसेच हा तरुण 19 वर्षांचा आहे. त्यामुळे अल्पवयीन नसलेल्या या आरोपीवर कठोर कारवाई होणार का? याकडे साऱ्यांचं लक्ष आहे.

बदलापूर्मध्ये 3 वर्षीय दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाला आहे. नर्सरीमध्ये शिकत असलेल्या या मुलींवर साफसफाई कर्मचाऱ्यानेच ज्याला त्या ‘दादा’ म्हणत असतं त्याने हा प्रकार केल्यामुळे पालकांसाठी ही माहिती अतिशय धक्कादायक आहे. बदलापूरमध्ये या प्रकरणानंतर रास्ता रोको, रेल रोको करण्यात आला. बदलापुरकर या प्रकरणानंतर आक्रमक झाले आहेत. सकाळपासून बदलापुरकर रस्त्यावर उतरले आहेत.

हेही वाचा :

राजकीय वर्तुळात खळबळ, बड्या नेत्याच्या घरावर ईडीचे छापे

वामिका – अकाय कोहलीचं पहिलं रक्षाबंधन, अनुष्काने शेअर केला क्यूट फोटो

महाभयंकर! नराधमाकडेच चिमुकलींना वॉशरुमला नेण्याची जबाबदारी, शाळेच्या कारनाम्याचा कहर