अमरावती : महायुती सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या लाडक्या बहीण योजनेवरुन जोरदार राजकारण (political) रंगले आहे. निवडणुकीच्या पूर्वी जाहीर करण्यात आलेली ही योजना अल्पावधीमध्ये लोकप्रिय करण्यात आली.
विधानसभा निवडणुकीच्या(political) प्रचारामध्ये महायुती सरकारने या योजनेचे पैसे 1500 वरुन 2100 वाढवणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र निवडणुकीनंतर लाडक्या बहिणींच्या अर्जाची पडताळणी सुरु झाली आहे. त्यामुळे सर्व महिला वर्गाची चिंता वाढली आहे. यावरुन आता विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे.
महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी आता लाडकी बहीण योजनेमध्ये चुकीच्या पद्धतीने अर्ज दाखल केलेल्या महिलांवर करडी नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे. राज्य सरकारची ही लाडकी बहीण योजना ही अडीच लाखपर्यंत उत्पन्न असलेल्या महिलांसाठी जाहीर केली आहे.
तसेच ज्यांच्या नावे चारचाकी गाडी आहे अशा महिलांना देखील या योजनेचा लाभ घेता येणार नाही. यासाठी अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन तपासणी करणार आहेत. यामुळे विरोधक आक्रमक झाले आहेत. प्रहारचे नेते व अचलपूरचे माजी आमदार बच्चू कडू यांनी टीका केली आहे.
मुख्यमंत्री लाडक्या बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या अर्जाची चाचपणी सुरु झाली आहे. पुण्यातील लाडक्या बहिणींकडील कारची येत्या सोमवारपासून तपासणी करण्यात येणार आहे. योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांकडे चारचाकी आढळल्यास, त्यांचं नाव योजनेतून वगळलं जाणार आहे.
आत्तापर्यंत जिल्ह्यातील 75 हजार बहिणींच्या घरात चारचाकी गाड्या आढळल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर सोमवारपासून पुण्यात ही तपासणी केली जाणार आहे. ज्या महिलेकडे चारचाकी गाडी आढळले, तिचं नाव लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांमधून वगळण्यात येईल. आधी 8 महिलांनी पैसे परत केले होते, त्या पाठोपाठ आता 30 महिलांनी पैसे परत करण्याची तयारी दर्शवली आहे.
हेही वाचा :
ट्रम्प यांची ऑफर अन् एकाच वेळी 40 हजार कर्मचाऱ्यांचा राजीनामा
बाबा रामदेव यांना न्यायालयाचा सर्वात मोठा झटका!
‘सिंग इज ब्लिंग’ फेम अभिनेत्री दुसऱ्यांदा होणार आई?, ‘ते’ फोटो तूफान व्हायरल