आता डेटवर जाण्यासाठी थेट पगारी सुटी, कंपनीच्या नव्या निर्णयाची जगभर चर्चा

मुंबई : सध्याच्या धकाधकीच्या जीवनात अनेकांना स्वत:ला वेळ देणं शक्य होत नाही. अनेकजण ऑफिसच्या(office) कामात एवढे व्यग्र झालेले असतात की त्यांना खासगी आयुष्यासाठी वेळच शिल्लक राहात नाही. कर्मचाऱ्यांची हीच अडचण लक्षात घेऊन आता एका कंपनीने थेट डेटसाठी पगारी सुटी देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या दिवशी डेटवर जायचे आहे, त्या दिवशी कर्मचाऱ्यांना कंपनीकडून रितसर सुटी दिली जाणार आहे. कंपनीच्या या निर्णयाची सध्या सगळीकडेच चर्चा होत आहे.

वेगवेगळ्या खासगी कंपन्यांत काम करणारे कर्मचारी वैयक्तिक कामांसाठी वेळ मिळत नसल्यामुळे त्रस्त असतात. कामाचा ताण आणि घरातल्या जबाबदाऱ्या सांभाळताना कर्मचाऱ्यांची चांगलीच परवड होते. त्यामुळे हेच वर्क प्रेशर कमी व्हावे यासाठी या कंपनीने टेडिंगवर जाण्यासाठी पेड लिव्ह देण्याचा निर्णय घेतला आहे.

कंपनीच्या(office) या निर्णयाची सध्या जगभर चर्चा होत आहे. ही कंपनी मूळची थायलँडची आहे. या कंपनीचे नाव व्हाईटलाईन ग्रुप आहे. ही कंपनी मार्केटिंगचे काम करते. कंपनीच्या या अनोख्या निर्णयाबाबत स्ट्रेट टाईम्स या वृत्तसंकेतस्थळाने वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार या कंपनीचा एखादा कर्मचारी डेटवर जाण्यासाठी रितसर पगारी रजा घेऊ शकतो. कर्मचारी आपल्या जोडीदारासोबत ज्या दिवशी डेटवर जाईल, त्या दिवशी त्याला पूर्ण पगार मिळणार आहे.

कंपनीने डेटवर जाण्यासाठी सुटी() देताना विशेष धोरण तयार केलं आहे. कंपनीने या सुटीला टिंडर लिव्ह असं नाव दिलंय. याला काहीजण डेटिंग लिव्ह असंही म्हणत आहेत. या सुटीच्या धोरणाअंतर्गत ही कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना टिंडर गोल्ड आणि टिंडर प्लॅटिनम सब्सक्रिप्शन देणार आहे. या पगारी सुटीची ऑफर कंपनीने आपल्या सर्वच कर्मचाऱ्यांना दिली आहे. मात्र वर्षभरात किती टिंडर लिव्ह मिळणार, हे कंपनीने स्पष्ट केलेले नाही.

व्हाईटलाईन ग्रुपच्या टिंडर लिव्हची सुरुवात या वर्षाच्या जुलै महिन्यापासून झालेली आहे. या वर्षाच्या शेवटपर्यंत रुजू होणाऱ्या सर्वच कर्मचाऱ्यांसाठी ही टिंडर लिव्ह लागू असेल. या पगारी सुटीबाबत कंपनीने त्यांच्या लिंक्डईनच्या अधिकृत खात्यावरही माहिती दिलेली आहे. आमचे कर्मचारी टेडिंगवर जाताना टिंडर लिव्ह घेऊ शकतात, असं यात नमूद आहे.

आपल्या कर्मचाऱ्यांचे हीत लक्षात घेऊन या कंपनीने टिंडर लिव्ह देण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं जातंय. प्रेमात पडल्यानंतर कर्मचारी आनंदी राहतो. याचा परिणाम ऑफिसमधील कामावर होतो. काम चांगले होते, अशी कंपनीची धारणा आहे. कंपनीच्या पॉलिसीनुसार 9 जुलैपासून ते 31 डिसेंबरपर्यंत रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना या सुटीचा लाभ मिळणार आहे. या कंपनीकडे साधारण 200 कर्मचारी आहेत.

हेही वाचा:

जात निहाय गणना कुणास हवी कुणास नको

पुढील 24 तास धोक्याचे, IMD कडून ‘या’ जिल्ह्यांसाठी महत्वाचा इशारा

‘जो हिंदू हित की बात करेगा, वही देशपर राज करेगा!’ ‘धर्मवीर 2’चा दुसरा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित