पुणे शहरातील वाहतूक सुरळीत करण्याबरोबर त्याला शिस्त लावण्यासाठी आता (check traffic)पुणे पोलीस ‘वाहतूक प्रशिक्षण संस्था’ स्थापन करणार आहे. या माध्यमातून पोलीस कर्मचारी, विद्यार्थी तसेच वाहतूक वॉर्डन यांना प्रशिक्षण दिले जाणार आहेत. त्यासोबत बेशिस्त वाहन चालकांना देखील कारवाईसोबतच शिस्तीचे धडे दिले जाणार असून, पाच दिवस अशा वाहन चालकांना ट्रेनिंग देऊन नंतर त्याचे एक सर्टिफिकेटही दिले जाणार आहे. नंतर त्यांना त्यांचे वाहन परत देण्याचा निर्णय घेतला गेला आहे.

शहरातील वाहतूकीचा प्रश्न गंभीर झाला आहे. दिवसेंदिवस तो आणखीनच गंभीर बनत चालला आहे. पोलीस वाहतूक सुरळीत करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत. परंतु, वाहतूक सुरळीत व कोंडी फुटत नसल्याचे वास्तव आहे. पोलीस कितीही प्रयत्न करत असले तरी बेशिस्त वाहन चालकांची संख्याही कमी होत नसल्याचे दिसत आहे. कारवाई केल्यानंतर देखील हे प्रमाण कमी होत नाही.
पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्याकडून सातत्याने वाहतूक (check traffic)कोंडीसाठी वेगवेगळे उपाययोजना करण्यावर भर दिला जात आहे. या पार्श्वभूमीवरच आता पुणे पोलिसांकडून वाहतूक प्रशिक्षण संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामाध्यमातून पुण्याची वाहतूक सुरळीत करण्याबरोबरच बेशिस्तांना चाप लावण्याचा प्रयत्न केला जात आहे.
वाहतूक प्रशिक्षण संस्था स्थापन केली जाणार.
संस्थेच्या पॅनेलमध्ये वाहतूक शाखेचे अधिकारी, खासगी एक्सपर्टचा सहभाग
संस्थेकडून पोलीस कर्मचारी व विद्यार्थ्यांना वाहतूकीचे प्रशिक्षण दिले जाणार
वाहतूक नियोजनासाठी विद्यार्थ्यांची मदत घेतली जाणार
बेशिस्त वाहन चालक राँग साईड, ड्रँक अँड ड्राईव्ह, ट्रिपल शिट, उलटा प्रवास करणाऱ्यांची वाहने जप्त केली जाणार
बेशिस्तांना या संस्थेत पाच दिवस वाहतूक नियमनाचे धडे दिले जाणार, त्याचे सर्टिफिकेट मिळणार मग वाहन दिले जाईल
वाहतूक प्रशिक्षण संस्था तात्काळ सुरू करण्याचा प्रयत्न, (check traffic)त्यासाठी जागा व आवश्यक गोष्टीही कामकाज सुरू केले
दीर- भावजयचा मृत्यू
गेल्या काही दिवसाखाली पुण्यातील जेल रोडवरील एका रुग्णालयासमोर गेल्या काही दिवसाखाली भरधाव कारने दिलेल्या धडकेत दीर भावजयीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. लोहगाव परिसरातील जेल रस्त्यावरील संजय पार्क येथे हा अपघात गुरूवारी सकाळी झाला. याप्रकरणी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशीर्वाद गोवेकर वय ५२, रेश्मा गोवेकर वय ४७ असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. याप्रकरणी कारचालक अचलकुमार वय ४३ याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत प्रसाद गोवेकर वय ५४, रा. शिव पार्वती मंगल कार्यालयाजवळ, गोकुळनगर, कात्रज-कोंढवा रस्ता यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
हेही वाचा :
थरारक व्हिडिओ! भरधाव ट्रक डोक्यावरून गेल्यावरही तो जिवंत, कसे घडले हे?
मुलींनी कसे करावे मुलांना प्रपोज? एकापेक्षा एक हटके Ideas
हिरवा वाटाणा अधिक काळासाठी कसा टिकवून ठेवावा?