आनलाईन शॉपिंगसाठी प्रसिद्ध असलेला फ्लिपकार्ट(flipkart business) आता फक्त शॉपिंग पुरतेच मर्यादित राहिले नाही तर बिल आणि रिचार्ज करण्याची सुविधाही देत आहे. फ्लिपकार्टने त्यांच्या अॅपवर पाच नवीन रिचार्ज आणि बिल पेमेंट पर्याय समाविष्ट केले आहेत.
या नवीन सेवांमध्ये FASTag रिचार्ज, DTH रिचार्ज, लँडलाइन बिल पेमेंट, ब्रॉडबँड पेमेंट(flipkart business) आणि मोबाईल पोस्टपेड बिल पेमेंट यांचा समावेश आहे. आधीपासून असलेल्या इलेक्ट्रिक आणि मोबाईल प्रीपेड रिचार्जच्या सोबत आता या नवीन सोयींमुळे फ्लिपकार्ट एक-स्टॉप शॉपिंग आणि बिल पेमेंट डेस्टिनेशन बनले आहे.
या नवीन सेवांना प्रोत्साहन देण्यासाठी फ्लिपकार्ट UPI वापरून ट्रान्सॅक्शन केल्यावर ग्राहकांना सुपरकॉइन्स द्वारे 10% पर्यंत सूट देत आहे. या मर्यादित काळाच्या ऑफरमुळे फ्लिपकार्टवर बिल भरणे आणखी फायद्याचे होणार आहे.
फ्लिपकार्टवर पेमेंट्स आणि सुपरकॉइन्सचे वाईस प्रेसिडेंट गौरव अरोरा यांनी सांगितले की, “उत्पादने खरेदी करण्यापासून ते डिजिटल पेमेंटची आवश्यकता पूर्ण करण्यापर्यंत, या वाढीव वैशिष्ट्यांमुळे ग्राहकांसाठी वन-स्टॉप डेस्टिनेशन तयार झाले आहे.”
ग्राहकांना सहजतेने बिल भरण्याचा अनुभव, वेळेवर सूचना मिळणे आणि निवडलेल्या बिलर्सच्या बिल रकमेची माहिती मिळण्यासाठी फ्लिपकार्ट बिलडेस्कसोबत भागीदारी करत आहे.
फ्लिपकार्ट अलीकडेच त्यांची य UPI सेवा सुरू केली आहे, जी रिचार्ज आणि बिल पेमेंटसाठी सुरक्षित आणि सोयीस्कर पर्याय देते. ग्राहकांना सुपरकॉइन्स आणि कॅशबॅक द्वारे रिवॉर्ड मिळवता येतात, तसेच एक-क्लिक आणि जलद पेमेंट सुविधांचा लाभ घेता येतो. ही सेवा ग्राहकांना ऑनलाइन शॉपिंग करत असो वा बिल भरत असो, सर्वसाठी डिजिटल पेमेंटचा अनुभव आणखी सुधारते.
या नवीन सेवांसह, फ्लिपकार्ट ग्राहकांना चांगला, कार्यक्षम आणि फायदेशीर अनुभव देण्यासाठी सतत काहीतर नावीन्यपूर्ण आणत आहे.गेल्या महिन्यातच त्यांनी फ्लिपकार्टवरुन १५ मिनिटात कोणतीही वस्तु पोहोचवण्याची सुविधा लॉंच करण्याची देखील घोषणा केली.
वाचा :
पंतप्रधान मोदींची शांततेची ग्वाही: “भारताने जगाला युद्ध नव्हे, तर बुद्ध दिले आहेत”
दूध उतू जाण्याच्या समस्येला रामराम ठोकण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय करा वापर!
कोल्हापूर: रुंदीकरणाच्या नावाखाली ‘विकासकामे’ रखडली, नागरिक हैराण