“युतीला भरभरून मतं दिली, आता हद्दवाढीबाबत युतीच निर्णय घेईल”; काय म्हणाले सतेज पाटील

कोल्हापूर(kolhapur)हद्दवाढीचा निर्णय सत्तेत असणाऱ्या महायुतीने घ्यायचा आहे. शेवटी सही त्यांची होणार आहे.अशी भूमिका आमदार सतेज पाटील यांनी सष्ट केली आहे. कोल्हापुरातील जनतेनं महायुतीला भरभरून दिलयं.त्यांनी हद्दवाढीसाठी योग्य तो निर्णय घ्यावा. सदर प्रकरण आमच्या हातात नाही.

कोल्हापूर(kolhapur) हद्दवाढीबाबत सरकारने सुस्पष्ट भूमिका जाहीर करावी. कोल्हापुरातील जनतेने महायुतीला भरभरुन मतं दिली आहेत. याचपार्श्वभूमीवर महायुतीचे आमदारा या ठिकाणी कार्यरत आहेत. त्यांनी योग्य तो निर्णय घ्यावा.

कोल्हापुरच्या जनतेने महायुतीला विधानसभेत कौल दिला आहे. त्यामुळे आता जबाबदारी आहे ती महायुतीच्या नेत्यांची त्यांनी कोल्हापुरच्या सर्वांगीण विकासाठी योग्य ती पाऊलं उचलणं गरजेचं आहे. त्यामुळे आता पुढचे पाच वर्ष सत्ताधारी सरकार काय करणार हे कोल्हापुरकर ठरवतीलच,अशी प्रतिक्रिया सतेज पाटील यांनी दिली आहे.

हेही वाचा :

उद्योगांना MSME च्या कक्षेत आणण्यासाठी नवे निकष; ५०० कोटी पर्यंतच्या उद्योगांना होणार लाभ

आमिर खानच्या आयुष्यात पुन्हा प्रेमाची एंट्री; ‘या’ व्यक्तीला करतोय डेट

उदित नारायण यांनी लाईव्ह शोमध्ये महिलेला केलं किस; व्हिडीओ तुफान व्हायरल