आता हार्दिक पांड्याच्या फोटोची रंगली चर्चा; नताशानेही साधलं टायमिंग

भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक हे गेल्या काही दिवसांपासून(time)सतत चर्चेत आहेत. हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांच्यात वाद सुरू असल्याचे सांगितले जातंय. हेच नाहीतर यांचा घटस्फोट होणार असल्याचीही चर्चा आहे.

हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक विभक्त राहत आहेत. भारतीय संघाने (time)T20 सामना जिंकल्यानंतरही नताशा हिने एकही पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली नाही. हार्दिक पांड्या आणि नताशा यांच्या घटस्फोटाची चर्चा असतानाच हार्दिक आणि एका मिस्ट्री गर्लचे व्हिडीओ आणि काही फोटो तूफान व्हायरल होत आहेत.

हार्दिक पांड्या आणि मिस्टी गर्लचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतानाच आता दुसरीकडे नताशा स्टॅनकोविकने सोशल मीडियावर काही व्हिडीओ शेअर केले आहेत. नताशा स्टॅनकोविक हिचे हे व्हिडीओ जिममधील आहेत. हे व्हिडीओ शेअर करत नताशा स्टॅनकोविक हिने खास कॅप्शनही शेअर केले आहे.

नताशाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत म्हटले की, मी इथे बसून कॉफी पीत आहे. माझ्या मनात एक विचार आला आणि मी तुमच्याशी शेअर करावे असे वाटले. लोक लोकांबद्दल किती लवकर सर्वकाही ठरवत असतात. त्यांना काहीच वाटत नाही. जर कोणी त्याच्या कॅरेक्टरबाहेर काही करत असेल तर लोक न थांबता काहीही बोलत सुटतात. त्याची परिस्थिती काय होत असेल? याचे त्यांना काहीच वाटत नाही. पण फक्त त्याला न्याय देण्यासाठी किंबहुना जज करण्यासाठी सर्वजण पुढे येतात, असं नताशा म्हणाली.

गेल्या काही दिवसांपासून हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक यांच्यात सर्वकाही आलबेल नाही, असा दावा केला जातोय. नताशाने काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर काही स्टोरीज शेअर केल्या होत्या. त्या पोस्टचा आधार घेत या दोघांच्या नात्यातील धुसफुसीचा अंदाज लावला जात होता. विशेष म्हणजे यावेळच्या आयपीएल पर्वात हार्दिक पांड्या मैदानात असताना एकाही सामन्यात नताशा स्टेडियममध्ये दिसली नाही. या कारणामुळेही दोघांच्या नात्याच्या अफवेला हवा मिळाली होती.

नताशाने हार्दिकसाठी विश्वचषक जिंकल्याची कोणतीही पोस्ट केलेली नाही. या विजयावर नताशाच्या बाजूने कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. त्याचवेळी, हार्दिकच्या मेहुण्याने, म्हणजेच मोठा भाऊ कृणाल पांड्याची पत्नी पंखुरी शर्माने भारताच्या विजयानंतर हार्दिकसाठी एक भावनिक पोस्ट केली होती. पोस्ट शेअर करत हार्दिकने पंखुरी शर्माला आपला आधारस्तंभ असं म्हटलं आहे.

हेही वाचा :

तुमचा जोडीदार रिलेशनशिपमध्ये तुमचा वापर तर करत नाही ना? कसं ओळखाल?

WhatsApp ने रोलआउट केला नवीन तगडा फिचर!

तुला शाळेतूनच काढतो, संचालकांच्या धमकीने विद्यार्थीची घरी जाऊन आत्महत्या