केंद्र आणि राज्य सरकार(PM Kisan) शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी आणि त्यांचे भविष्य आर्थिक पातळीवर सुरक्षित करण्यासाठी अनेक योजना राबवत आहेत. यापैकीच एक महत्त्वाची योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना.

या योजनेअंतर्गत, भारत सरकार देशातील गरीब शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपयांची आर्थिक मदत करत आहे. आज देशातील कोट्यवधी शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत.
आतापर्यंत सरकारने या(PM Kisan) योजनेचे एकूण १८ हप्ते वितरीत केले आहेत. ५ ऑक्टोबर २०२४ रोजी केंद्र सरकारने महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यात या योजनेचा हप्ता वितरित केला होता. आता केंद्र सरकारकडून पीएम किसान योजनेच्या नियमावलीत बदल करण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पीएम किसान योजनेचा १९ वा हप्ता हा फेब्रुवारी महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाऊ शकतो. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
कुटुंबातील एकाच व्यक्तीला लाभ केंद्र सरकारच्या नवीन नियमानुसार आता कुटुंबातील फक्त एकाच सदस्याला या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
आधार कार्ड अनिवार्य योजनेसाठी अर्ज करताना पती, पत्नी आणि मुलांचे आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे.

आयकर भरणारे अपात्र : नवीन नियमानुसार जे लोक आयकर भरतात त्यांना या योजनेतून वगळण्यात आले आहे.
या योजनेची सुरुवात झाली तेव्हा एका कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्यांनी पीएम किसान योजनेसाठी अर्ज केले होते आणि त्यांना या योजनेचा लाभ मिळत होता. मात्र, सरकारच्या नवीन नियमांमुळे अनेक शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार आहेत.
हेही वाचा :
नाराजी नाट्यानंतर भुजबळ-पवार आमनेसामने!
पोलिसानं कारण नसताना महिलेला चोपलं, रणथंबोर एक्सप्रेसमधील Video Viral
अभिनेता सैफ अली वर हल्ला……घटना एक, प्रश्न मात्र अनेक