UPI सेवा(upi payment app) 2016 मध्ये भारतात सुरू झाली. त्यानंतर भारताने मागे वळून पाहिलेच नाही. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या NPCI अहवालानुसार, UPI पेमेंटच्या बाबतीत भारताने चीन आणि अमेरिका सारख्या देशांना खूप मागे सोडले आहे. भारताच्या UPI म्हणजेच युनिफाइड पेमेंट इंटरफेसने चीनच्या Alipay आणि अमेरिकेच्या PayPal ला मागे टाकून एक नवीन विक्रम आपल्या नावावर करून घेतला आहे. भारताने 2023 मध्ये प्रति सेकंद 3,729 UPI ट्रांजॅक्शन नवा रेकॉर्ड बनवला आहे.
UPI पेमेंट(upi payment app) करताना अनेक वेळा युजर्सना खराब इंटरनेटचा सामना करावा लागतो. यासाठी NPCI ने नुकतीच इंटरनेटशिवाय UPI पेमेंट करण्याची सुविधा सुरू केली आहे. याद्वारे जरी तुम्ही कुठेतरी असाल जेथे इंटरनेट सुविधा नाही किंवा तुमचा मोबाइल डेटा संपला आहे, तरीही इंटरनेटशिवाय तुम्ही तुमच्या फोनवरून UPI पेमेंट करू शकता. यासाठी तुम्हाला एक सिक्रेट कोड लक्षात ठेवावा लागेल आणि काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
UPI पेमेंट सेवेचा लाभ घेण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचा मोबाईल नंबर, आधार क्रमांक इत्यादी बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे. यानंतर तुमचा मोबाईल नंबर आणि बँक खाते UPI आयडी तयार करण्यासाठी वापरावे. तुमचा मोबाईल नंबर UPI खात्याशी लिंक असेल तरच तुम्ही या सुविधेचा लाभ घेऊ शकता. तुमचा मोबाईल नंबर वापरून UPI आयडी तयार करण्यासाठी तुम्ही कोणतेही पेमेंट ॲप किंवा BHIM UPI ॲप वापरू शकता. UPI आयडी तयार केल्यानंतर, तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन UPI पेमेंट सुविधेचा लाभ घेऊ शकता.
- ऑफलाइन UPI पेमेंट करण्यासाठी, तुम्हाला गुप्त USSD कोड ‘*99#’ लक्षात ठेवावा लागेल
- हा कोड तुमच्या फोनच्या डायल पॅटवर टाइप करा आणि कॉलिंग बटण दाबा
- यानंतर तुम्हाला स्क्रीनवर Welcome to *99# असा मेसेज दिसेल. या संदेशासह येणारा ओके टॅप करा
- पुढील पृष्ठावर तुम्हाला अनेक पर्याय मिळतील, ज्यात Send Money, Request Money, Check Balance, My Profile, Pending Request, Transactionsआणि UPI PIN यांचा समावेश आहे
- यापैकी, तुम्हाला पेमेंट करण्यासाठी पाठवा पर्याय आणि पेमेंट प्राप्त करण्यासाठी Request Money करण्याचा ऑप्शन निवडावा लागेल
- यांनतर तुम्हाला पर्यायांमध्ये Mobile Number, UPI आयडी इत्यादी मिळेल
- यापैकी एक निवडा आणि पुढे जा
- त्यानंतर ज्या व्यक्तीला तुम्ही UPI पेमेंट करू इच्छिता त्या व्यक्तीचे तपशील टाकल्यानंतर तुम्हाला पुढील पेजवर जावे लागेल
- येथे तुमचा UPI PIN टाका आणि अशा प्रकारे तुम्ही ऑफलाइन UPI पेमेंट सेवा करू शकता
हेही वाचा:
नायक विरुद्ध खलनायक शरद पवार विरुद्ध मुश्रीफ
लालपरी पुन्हा सुस्साट! एसटी कर्मचाऱ्यांच्या कोणत्या मागण्या मान्य
चिमुकल्याने अंगावर उलटी केली, आईच्या बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं, बेदम मारहाणीत मुलाचा मृत्यू