आता प्रेयसी मिळणार भाड्यावर

घर, कपडे, एसी, भांडी या गोष्टींवर ऑफर पाहिली असेल मात्र आता प्रेयसी (girlfriend)भाड्याने मिळणार आहे. विश्वास बसत नसेल पण हे खरं आहे. दिल्लीतील एका तरुणीने रेंट वर ‘गर्लफ्रेंड अशा ऑफरची अनोखी पोस्ट इंस्टाग्रामवर टाकली आहे. कहर म्हणजे त्यासाोबत तिने तिच्या दरांची यादीही टाकली आहे. ही पोस्ट आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून युजर्सच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया त्यावर येत आहेत.

दिल्लीतील दिव्या नावाच्या तरुणीने 1500 रुपयांपासून 10 हजार रुपयांपर्यंत ही स्कीम दिली आहे. दिव्याच्या म्हणण्यानुसार, जर तुम्ही सिंगल असाल आणि कोणत्या तरुणीसोबत डेटवर जाऊ इच्छित आहात तर मी यायला तयार आहे, पण त्यासाठी तुम्हाला पैसे मोजावे लागणार. त्या व्हायरल झालेल्या तरुणीने आपल्या दरांची यादी इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली.

त्यानुसार, कॉफी डेटसाठी 1500 रुपये तर नॉर्मल डेटसाठी 2 हजार रुपये, (girlfriend)कुटुंबियांना भेटवणार असाल तर 3 हजार, कोणत्या इव्हेण्टमध्ये प्रेयसी म्हणून न्यायचे असल्यास साडेतीन हजार, बाईक डेटसाठी 4 हजार, डेटचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करायचे असल्यास 6 हजार, अॅडवेंचर डेट 5 हजार, घरात एकत्र कुकिंग करण्यासाठी 3500, शॉपिंग डेटसाठी 4500, विकेंण्डवर दोन दिवस एकत्र फिरण्यासाठी 10 हजार रुपये असे दर तिने पोस्ट केलेल्या यादीत देण्यात आले आहे.

तीन दिवसांपूर्वी केलेल्या या पोस्टवर लोक वेगवेगळ्या पद्धतीने प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने म्हटले, ‘हे जपानमध्ये आहे असे वाटते.’ बाथरूम आणि भांडी धुण्यासाठी (girlfriend)किती पैसे द्यावे लागतील, अशी विचारणाही काहींनी केली. इंस्टाग्राम व्यतिरिक्त, X वर देखील रील व्हायरल आहे. अनेकांनी घोटाळ्याची भीती व्यक्त केली तर काहींनी याला हनी ट्रॅप म्हटले आहे.आता प्रेयसी मिळणार भाड्यावर

हेही वाचा :

बड्या नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार; तटकरेंच्या दाव्याने खळबळ

सांगलीत लोकसभा निकालाआधीच महायुतीत उडाले खटके…

सावधान! गुगल मॅप वापरत असाल तर ; गमवावे लागतील प्राण, नेमकं काय घडलं