नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्थेच्या वेगवान वाटचालीवर संपूर्ण जगाचे(world)लक्ष लागून आहे. गेल्या काही वर्षात भारताच्या विकासवाढीने लक्षणीय कामगिरी बजावली असून करोनामुळे एकीकडे जागतिक अनेक देश संघर्ष करत होते तर दुसरीकडे भारताने गती कमी पडू दिली नाही. मोदी सरकारने सरकार तिसऱ्यांदा सत्तेवर येताच भारताला तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनवण्याचा आहे, जी सध्या पाचव्या स्थानावर आहे. आता भारतीय रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) डेप्युटी गव्हर्नर मायकल पात्रा यांनी भारतीय इकॉनॉमीवर मोठे भाकीत वर्तवले आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (आरबीआय) डेप्युटी गव्हर्नर मायकल डी पात्रा यांनी ही मोठी उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली. मसुरी येथील लाल बहादूर शास्त्री नॅशनल ॲकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये भाषण देताना मायकल पात्रा यांनी सांगितले की, आता जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्यासाठी २०४८ सालाची वाट पाहावी लागणार नाही.
मायकल म्हणाले की भारतामध्ये(world) २०३१ पर्यंत जगातील दुसरी मोठी अर्थव्यवस्था बनण्याची ताकद आहे पण, यासाठी देशाला अनेक महत्त्वाच्या आव्हानांना सामोरे जावे लागेल. एवढेच नाही तर २०६० पर्यंत अमेरिकेला मागे टाकून जागतिक महासत्ता बनण्याचीही भारतामध्ये क्षमता आहे.
डेप्युटी गव्हर्नर म्हणाले की, भारताचा मजबूत पाया आणि अंतर्भूत क्षमता पाहता २०३१ पर्यंत देश जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू शकतो तर २०६० पर्यंत जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याची आपल्यात क्षमता आहे.
त्यांनी आपल्या संबोधनात पुढे म्हटले की, ‘मी नमूद केलेली मूलभूत शक्ती आणि आपली महत्त्वाकांक्षी उद्दिष्टे साध्य करण्याचा दृढनिश्चय पाहता २०४८ पर्यंत नव्हे तर २०३१ आणि २०६० पर्यंत भारत अनुक्रमे पुढील दशकात जगातील दुसरी सर्वात मोठी आणि जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याची कल्पना करणे शक्य आहे.’ याशिवाय रिझर्व्ह बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, पुढील दहा वर्षांत भारताचा वार्षिक दर ९.६% दराने वाढल्यास निम्न मध्यम उत्पन्नाच्या सापळ्यातून मुक्त होईल आणि विकसित अर्थव्यवस्था बनेल.
भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने
-पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणुकीचा अभाव: अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक गरजेची आहे.
-शिक्षण आणि आरोग्यसेवेत सुधारणा: कर्मचारी अधिक कुशल बनवण्यासाठी शिक्षण आणि आरोग्य सेवा प्रणाली सुधारणे करणे भाग आहे.
-इज ऑफ डुईंग बिझनेस: परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी भारताला व्यवसाय करण्याची सुलभता सुधारण्याची गरज आहे.
हेही वाचा :
एमएस धोनीचं बाईक प्रेम! लाखोंच्या बाईक अन् कोट्यवधींच्या कार
गणेशोत्सव गोड होणार! शिंदे सरकारकडून मिळणार ५६० कोटींचा आनंदाचा शिधा
आमदारांना शेअर मार्केटसारखा भाव, कुणाला २५ कोटी, तर… ; संजय राऊतांचा आरोप