सांगलीत आज ओबीसी आरक्षण बचाव महाएल्गार मेळावा

सांगली : पश्चिम महाराष्ट्रात एकीकडे मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली(reservation) सुरू आहे. तर दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रमधीलच सांगली जिल्ह्यात आज दुपारी ओबीसी आरक्षण बचाव महाएल्गार मेळावा पार पडणार आहे. या मेळाव्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातून लाखो ओबीसी बांधव सहभागी होणार आहेत.

या मेळाव्यास मंत्री छगन भुजबळ, पंकजा मुंडे, प्रकाश शेंडगे, गोपीचंद पडळकर, लक्ष्मण हाके(reservation) उपस्थित राहणार आहेत. या सभेतून छगन भुजबळ नेमकं काय बोलणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

सांगली येथील तरुण भारत स्टेडियम येथे दुपारी 2 वाजता हा मेळावा सुरू होणार आहे. मनोज जरांगेंची मराठा आरक्षण ओबीसीमधून मिळण्याची मागणी घटनेला धरून नाही. तसेच जरांगे दररोज आपल्या नवनवीन मागण्या बदलत गेल्यामुळे मराठा आंदोलनाची दिशा भरकटली आहे, असे ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी म्हटले आहे.

तसेच मनोज जरांगेंनी विधानसभेत उमेदवार दिले तर ओबीसी देखील आपली ताकद दाखवून जे ओबीसी आरक्षणाला विरोध करतील त्यांना पाडण्याचं काम करेल आणि याची ट्रायल लोकसभेमध्ये झालेय, असं प्रकाश शेंडगे यांनी म्हटले आहे. आजच्या ओबीसी आरक्षण बचाव महाएल्गार मेळाव्याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे हे राज्यभरात जनजागृती शांतता फेरी काढत आहेत. सोलापूर आणि सांगलीनंतर आज (रविवारी) ही फेरी पुण्यात दाखल होणार आहे. त्या निमित्ताने स्वागताची मोठी तयारी करण्यात आली आहे.

मनोज जरांगे-पाटील यांच्या उपस्थितीत फेरी काढण्यात येणार आहे. यामुळे पुणे शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहे. जरांगेंच्या रॅलीच्या पार्श्वभूमीवर शनिपार चौक ते कुमठेकर रस्ता, बेलबाग चौक ते लक्ष्मी रस्ता, केळकर रस्ता, रमणबाग प्रशाला ते अप्पा बळवंत चौक, बुधवार चौक ते अप्पा बळवंत चैाक, जयंतराव टिळक पूल ते शनिवारवाडा, कुंभारवेस चौक ते गाडगीळ पुतळा, मंगला चित्रपटगृह ते प्रीमियर गॅरेज शिवाजी पुतळा चौक ते शिवाजीनगर न्यायालय, रेव्हेन्यू कॉलनी ते मॉडर्न चौक, झाशीची राणी पुतळा चौक ते सावरकर भवन, महात्मा फुले संग्रहालय ते झाशीची राणी पुतळा चौक या मार्गावरील वाहतूक बंद राहणार आहे.

हेही वाचा :

ठाण्यातील राड्याचे कोल्हापुरात पडसाद; संतप्त कार्यकर्त्यांनी मनसेचे बॅनर फाडले

“माझ्या त्या गरजा खूपच कमी झाल्या आहेत”, प्राजक्ता माळीचा सर्वात मोठा खुलासा!

मंत्र्यांच्या दौऱ्याला काळे झेंडे व निदर्शने निर्णय ८ दिवसासाठी स्थगित