अरे देवा… गुगल मॅपचं नक्की चाललयं तरी काय?

गुगल मॅपशी(Google Maps) संबंधित नवनवीन प्रकरणं दररोज समोर येत आहेत. या सर्वांमुळे आताा गुगल मॅपवर विश्वास ठेवणं किती योग्य आहे, अशी शंका उपस्थित होत आहे. एखाद्या अनोळखी ठिकाणी गेल्यानंतर किंवा प्रवासावेळी आपण गुगल मॅपचा वापर करतो. आपण रस्ता चुकू नये आणि आपल्या लोकेशनपर्यंत सुखरूप पोहोचावं यासाठी गुगल मॅपचा वापर केला जातो. पण सध्या गुगल मॅपशी संबंधित अनेक प्रकरणं समोर येत आहेत.

आपल्या लोकेशनपर्यंत सुखरूप पोहोचावं या उद्देशाने आपण गुगल मॅपचा(Google Maps) वापर करतो. पण गुगल मॅपमुळे अपघात झाल्याची प्रकरण आता समोर येत आहेत. ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे आणि गुगल मॅपच्या वापरावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यापूर्वी गुगल मॅपमुळे उत्तर प्रदेशातील बदाऊन आणि बरेली येथे दोन कार अपघात झाले आहेत. एका अपघातात गाडीमधील तिघांचा मृत्यू झाला तर दुसऱ्या अपघातामध्ये गाडीमधील तिघेजण गंभीर जखमी झाले. दोन दिवसांपूर्वी गुगल मॅपमुळे एक कुटूंब जंगलात गेल्याची घटना घडली होती. या सर्वांची चर्चा सुरु असतानाच आता एक नवीन प्रकरण समोर आलं आहे.

गुगल मॅपने बांधकाम सुरु असलेल्या पुलाचा पूर्ण रस्ता दाखवला आहे. यामुळे सर्वांचाच गोंधळ उडाला आहे. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील बरेली येथे गुगल मॅपमुळे अपघात झाला होता. चालक गुगल मॅपवर दाखवलेल्या रस्त्याप्रमाणे गाडी चालवत होता. चालकाने गुगल मॅपवर दाखवलेल्या रस्ताप्रमाणे गाडी पुलावर नेली. मात्र हा पुल तुटला होता आणि पुलावर गाडी नेताच ती नदीत पडली. या अपघतात तिघांचा मृत्यू झाला. यानंतर या अपघाताची चौकशी सुरु करण्यात आली.

या अपघातानंतर प्रशासन अलर्ट मोडवर आलं. बरेलीतील घटनेनंतर औरैया जिल्ह्यातील प्रशासनानेही गुगल मॅपवर दाखवलेल्या रस्त्यांच्या अचूकतेवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. यानंतर, औरैया-फाफुंड रस्त्यावरील एक पूल अद्याप पूर्ण झालेला नसून, गुगल मॅप हा पूल पूर्ण दाखवत असल्याचे तपासात समोर आले आहे. अशा परिस्थितीत या पुलाचा कोणी वापर केला असता तर पुन्हा मोठी दुर्घटना घडू शकली असती.

हा धोका पाहून औरैयाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ कारवाई करत अपूर्ण पुलाच्या दोन्ही बाजूला भिंती बांधल्या. तसेच या भिंतींवर रस्ता बंद आहे, अशी सूचना देखील लिहीण्यात आली आहे. त्यामुळे यापुढे लोकांना या रस्त्याचा वापर करता येणार नाही आणि बरेलीसारखे अपघात टळतील.

हेही वाचा :

शरद पवार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत…

लग्नाचं आमिष, अल्पवयीन मुलीला पळवून नेलं अन् मग नको तेच घडलं

मोठी बातमी ! काँग्रेसच्या ‘या’ खासदाराने राजीनामा देण्याचं केलंय विधान