ऑलिम्पिक मेडलिस्ट पीव्ही सिंधू अडकणार लग्नबंधनात; इन्स्टावर एंग्जेमेंन्टचे फोटो

भारताची स्टार बॅडमिंटनपटू तथा दोन वेळची ऑलिम्पिकपदक विजेती पीव्ही सिंधू लवकरच लग्नबंधनात(marriage) अडकणार आहे. तिने स्वतः अधिकृत इन्स्टाग्राम हॅंडलवरून पोस्ट करीत याची माहिती दिली आहे. अशा स्थितीत प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न निर्माण होत आहे की त्यांचा भावी नवरा कोण? तिच्या भावी पतीचा खेळाशी काय संबंध आहे आणि त्याची एकूण परिस्थिती काय आहे, ही सर्व माहिती आपण जाणून घेणार आहोत.

भारताची स्टार बॅडमिंटनपटू तथा ऑलिम्पिक मेडलिस्ट पीव्ही सिंधू लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. हा लग्नसोहळा(marriage) राजस्थान उदयपूर येथे रंगणार आहे. दिनाक 22 डिसेंबर रोजी 29 वर्षीय पीव्ही सिंधू उदयपूरमध्ये व्यंकट दत्ता साईसोबत बोहल्यावर चढणार आहे. मात्र, 20 डिसेंबरपासूनच लग्नाची तयारी सुरू होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

हैदराबादचे रहिवासी व्यंकट दत्ता हे अनुभवी उद्योजक म्हणून गणले जातात. सध्या ते Posidex Technologies चे कार्यकारी संचालकपदावर आहेत. वेंकट दत्ता यांनी फ्लेम विद्यापीठातून बीबीए पूर्ण केले. तसेच IIIT बंगलोर (इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बंगलोर) मधून मशीन लर्निंग आणि डेटा सायन्समध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली.

व्यंकट दत्ता साईचेही आयपीएलशी संबंध आहेत, त्यांनी एक संघ सांभाळला आहे. त्यांनी आपल्या लिंक्डइन खात्यावर ही माहिती शेअर केली आहे की त्यांनी जेएसडब्ल्यू ग्रुपमध्ये काम केले आहे. हा समूह दिल्ली कॅपिटल्सचा सह-मालक आहे. या अनुभवातून खूप काही शिकल्याचेही त्यांनी सांगितले.

वेंकटने बहुतेक नोकऱ्या केल्या आहेत. तथापि, फोर्ब्सनुसार, पीव्ही सिंधूची एकूण संपत्ती 7.1 दशलक्ष यूएस डॉलर होती, जी भारतीय रुपयांमध्ये सुमारे 59 कोटी आहे.

हेही वाचा :

एकनाथ शिंदेंना मंत्रिमंडळात घेऊ नका; फडणवीसांकडे ‘या’ नेत्याने केली मागणी

‘हाऊसफुल 5’ च्या शूटिंगदरम्यान अक्षय कुमारला दुखापत…

Tata च्या ‘या’ दोन लोकप्रिय EV कारवर मोफत चार्जिंगची ऑफर