एकीकडे चितेवर जळतोय मृतदेह तर दुसरीकडे आयटम गर्ल करतेय डान्स चित्तथरारक Video Viral

हिंदू धर्मात मृतांवर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले (crematorium)जातात. चितेवर ठेवून मृतदेहाला आग लावली जाते. इथले दृश्य फारच वेगळे असते. लहान मुलांना आणि महिलांना इथे जाण्यास मनाई असते. अनेकजण तर इथे जायलाही घाबरतात, कारण इथे भुतांचे वास्तव असल्याचे म्हटले जाते. विनाकारण कुणीही स्मशानभूमीत जाण्याची हिंमत करत नाही. अशातच आता स्मशानभूमीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्याने लोकांना हादरवून सोडले आहे. यातील दृश्ये तुमच्या कल्पनेपलीकडची असून तुम्हाला ती पाहून आश्चर्याचा धक्का बसू शकतो. यात नक्की काय आहे ते जाणून घेऊया.

स्मशानभूमीसारख्या पवित्र आणि शोकस्थळी लोकांनी ऑर्केस्ट्रा आयोजित केल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. ज्यामध्ये एक मुलगी डान्स करताना दिसत आहे. लोकही इथे उभे राहून हा डान्स पाहताना आणि याची मजा लुटताना दिसून आली. काही लोक तर यावेळी आयटम गर्लचा (crematorium)हा डान्स आपल्या मोबाईल कॅमेरामध्ये कैद करत होते. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये स्मशानभूमीत मृतदेह जळत असल्याचे दिसत आहे. त्याचवेळी काही तरुण शेजारीच गोंधळ घालत आहेत.

तरुण-तरुणी नाचताना, गाताना यात दिसून येत आहे. या व्हिडिओने आता सर्वांना थक्क केले असून लोक आता यावर आपल्या निरनिराळ्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. स्मशानभूमीसारख्या ठिकाणी असे काहीतरी करणे अनेकांसाठी फार भयानक आणि आश्चर्यकारक होते ज्यामुळे मोठ्या संख्येने हा व्हिडिओ पाहण्यात आणि शेअर करण्यात आला.

हा व्हायरल व्हिडिओ नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून (crematorium)शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आणि लाइक केला आहे. या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “जिवंतही खुश, मृतही खुश” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “पूर्ण भूत समाज खुश झाला” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “घ्या यमराजही खुश झाले”.

हेही वाचा :

भाषण सुरू असतानाच मनोज जरांगेंची प्रकृती बिघडली

इचलकरंजी शहरात पाणीपुरवठ्याच्या समस्येसंदर्भात जोरदार निदर्शने; मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात नागरिकांचा रोष

दहावीच्या विद्यार्थिनीला अश्लील व्हिडीओ पाठवला? मुख्याध्यापकाने स्वत:ला संपवलं

रेखा आणि अमिताभ यांच्या नात्याचं गुपित उघड? बच्चन म्हणाले, “ती माझी…”

सुपरस्टार प्रभास लवकरच अडकणार लग्न बंधनात? ‘या’ मुलीशी जोडले नाव

‘तारक मेहताच्या’ ; चाहत्यांसाठी मोठी गुड न्यूज, अखेर द्याबेनची होणार एन्ट्री!