गुजरातच्या धर्तीवर, आता कोल्हापुरातही चिंतन व्हावे!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : काँग्रेसची स्थापना होऊन जवळपास 140 वर्षे होत आहेत. स्वातंत्र्योत्तर काळात पहिली वीस ते पंचवीस वर्षे गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्वत्र काँग्रेसची(congress) सत्ता होती. ग्रामपंचायती पासून ते अगदी थेट लोकसभेपर्यंतचे लोकप्रतिनिधी हे बहुतांशी काँग्रेसचेच होते. आता ही राजकीय परिस्थिती राहिलेली नाही. काँग्रेसची देशभर मोठी पडझड झाली आहे.

ज्या गुजरात मधून त्याची सुरुवात झाली, त्याच गुजरातमध्ये काँग्रेसचे(congress) 84 वे राष्ट्रीय अधिवेशन या एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजे नुकतेच पार पडले. लोकसभेच्या सलग तीन निवडणुकीत तसेच इतर काही राज्यात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा अगदी दयनीय पराभव का झाला? याबद्दल या अधिवेशनात विचारमंथन नव्हे तर आत्मचिंतन करण्यात आले. अगदी तसेच आत्मचिंतन अगदी जिल्हा पातळीवरही विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यातील उरल्या सुरल्या काँग्रेसने केले पाहिजे.

गुजरातच्या अहमदाबाद मध्ये काँग्रेसचे हे राष्ट्रीय अधिवेशन दिनांक 8 आणि दिनांक नऊ एप्रिल रोजी झाले. त्याच्या आधी म्हणजे 64 वर्षांपूर्वी म्हणजे 1961 मध्ये गुजरातच्या भावनगर मध्ये काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन झाले होते. तेव्हाच्या अधिवेशनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना नीलम संजीव रेड्डी यांनी “पक्षात शिस्तीला महत्त्व असले पाहिजे. आपण निवडणुकीला कशासाठी उभे आहोत हे उमेदवारांना सर्वसामान्य जनतेला सहजपणे समजावून सांगता आले पाहिजे”असे त्यांनी सांगितले होते. त्याचीच उजळणी अहमदाबाद येथे या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात झालेल्या अधिवेशनात करण्यात आली.

गुजरातच्या अहमदाबाद येथे झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनात कोल्हापूर जिल्ह्यातून कोणी उपस्थित होते का हे माहीत नाही पण गुजरातमध्ये जे आत्मचिंतन झाले, जे विचार मंथन झाले त्याची पुनरावृत्ती कोल्हापूर जिल्ह्यात झाली पाहिजे. कारण विधानसभेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे हात हे चिन्ह अदृश्य झाले आहे. काँग्रेसचा हे काही उमेदवार विजयी झाला नाही. हे या जिल्ह्याच्या काँग्रेसच्या इतिहासात पहिल्यांदाच घडले आहे. विधान परिषदेत काँग्रेसचे गटनेते असलेले सतेज पाटील हेच काँग्रेसचे विद्यमान जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांच्याच नेतृत्वाखाली विधानसभा निवडणूक लढवली गेली आणि एकही उमेदवार विजयापर्यंत पोहोचला नाही हे राजकीय वास्तव आहे.

चाळीस वर्षांपूर्वी काँग्रेसची(congress) इथे किती भक्कम स्थिती होती हे सांगण्यासाठी केवळ एक उदाहरण पुरेसे आहे. कोल्हापूर महापालिकेचे महापौर पद काँग्रेसकडे होते. विरोधी पक्षात जवळपास अस्तित्वात नव्हता. म्हणून मग काँग्रेस मधीलच एक गट तांत्रिकलत्या बाजूला गेला आणि त्या गटाला विरोधी पक्ष मो नेते पद देण्यात आले. म्हणजे महापौर आणि विरोधी पक्ष नेता काँग्रेसचाच होता. आता ही महापालिका स्वतःचे पाटील यांच्याच ताब्यात प्रशासक राज येईपर्यंत होती. आणि याच सतेज पाटील यांना 2024 च्या विधानसभा निवडणुकीत”हात”हे चिन्ह टिकवता आले नाही. काँग्रेस पक्षासाठी हे फारच धक्कादायक होते.

नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत सतेज पाटील यांनी उमेदवार निवडीच्या प्रक्रियेत जवळच्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा विश्वासात घेतलेले नव्हते. काँग्रेस मधील एक मोठा गट नाराज होता. विधानसभा निवडणूक निकालानंतर सतेज पाटील यांनी पराभवाच्या कारणांचा शोध घेण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक घेतलेली नव्हती. राष्ट्रीय पातळीवरील काँग्रेसचे नेते राष्ट्रीय अधिवेशन घेऊन पराभव का झाला यासाठी चर्चा करत असतील तर मग कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेतृत्वाने अशी चर्चा का करू नये?

सतेज पाटील यांच्याकडे संघटन कौशल्य आहे. म्हणूनच तर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदाच्या नावाची चर्चा सुरू झाली होती तेव्हा अध्यक्षपदाच्या शर्यतीत त्यांचेही नाव घेतले जात होते. पण त्यांची विधान परिषदेच्या काँग्रेस पक्षाच्या गटनेतेपदी निवड करून त्यांच्यासाठी भविष्यात चांगले दिवस आहेत याचे संकेत काँग्रेसच्या पक्ष श्रेष्ठींनी दिले आहेत. इसवी सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे चार उमेदवार निवडून आणले होते.

2024 च्या लोकसभा निवडणुकीत श्रीमंत शाहू छत्रपती यांना कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून निवडून आणण्यात त्यांचे योगदान मोठे होते. पक्षीय राजकारणात त्यांना मोठे स्थान होते आणि आहे पण तरीही कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रीय पातळीवरील काँग्रेस पक्षाची कमालीची घसरण झालेली दिसते. त्या मागची कारणे त्यांनाच शोधावी लागणार आहेत.

हेही वाचा :

अंगात देवी आल्याचे सांगत महिलेचे चिमुकल्याबरोबर जीवघेणे कृत्य

सांगलीत लग्नाच्या आमिषाने दिव्यांग तरुणीवर अत्याचार

वैरीण आईने लेकीचेच नको ते व्हिडिओ काढून स्वतःच्या बॉयफ्रेंडला पाठवले आणि….