एसटी-दुचाकीच्या धडकेत एकाचा दुर्दैवी मृत्यू, दुसऱ्याची प्रकृती चिंताजनक

दापोली-दाभोळ मार्गावर उंबर्ले येथे आज सकाळी एक भीषण अपघात (accident)घडला. दापोलीकडून दाभोळकडे जाणाऱ्या एसटी बस आणि समोरून येणाऱ्या दुचाकीची जोरदार धडक झाली. या अपघातात दुचाकीस्वार तैहसीन मथरुजी (वय ३५, रा. दाभोळ) यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीवर मागे बसलेले शमशुद्दीन दांडेकर (रा. दाभोळ) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा:

आईच्या निर्घृणतेचा कळस: अल्पवयीन मुलीला विकून लग्न लावले

महाराष्ट्र बंद आहे की नाही? हायकोर्टाच्या मनाईनंतर मविआचं पाऊल मागे, बंदची शक्यता धूसर

काँग्रेस प्रवक्त्याच्या वादग्रस्त विधानावरून राजकीय वातावरण तापले