सर्वसामान्यांना कांदा रडवणार! दर कमी होणार की नाही?

सध्या कांद्याचे(Onion) दर गगनाला भिडले आहेत. कारण कांद्याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र किरकोळ बाजारात कांद्याचा दर हा तब्ब्ल 80 रुपये किलोवर पोहोचला आहे. याशिवाय सरासरी कांद्याचा दर हा तब्ब्ल 50 रुपये किलोच्या आसपास पोहचला आहे. त्यामुळे कांदा असणाऱ्या शेतकऱ्यांना हा एकप्रकारे मोठा दिलासाच आहे.

मात्र कांद्याच्या(Onion) वाढत्या दरामुळे ग्राहकांच्या खिशाला मोठा फटका बसू नये म्हणून राज्य सरकारने उपाययोजना करुन देखील कांद्याचे दर वाढतच चालले आहेत. राज्य सरकारने उपायोजना करुन देखील कांद्याचे दर वाढतच चालले आहेत. त्यामुळे अनेक शहरात सरकारने कमी दरात कांद्याची विक्री देखील सुरु केली आहे.

मात्र, तरी देखील कांद्याचे दरात घसरण होत नसल्याचे दिसून येत आहे. तसेच राज्य सरकारने सवलतीच्या दरात कांदा विकण्यास देखील सुरवात केली आहे. मात्र असे असतानाही किरकोळ बाजारात कांद्याचा दर हा तब्ब्ल 80 रुपये किलोवर कायम आहे.

कांद्याच्या किरकोळ बाजाराचा विचार केला तर किरकोळ बाजारात कांद्याची कमाल किंमत ही 80 रुपये प्रति किलो आहे, तर काही बाजारात कांदा 27 रुपयांपर्यंत स्वस्त दराने विकला जात आहे. काल 10 सप्टेंबर रोजी देशभरात कांद्याची सरासरी किरकोळ किंमत 49.98 रुपये प्रति किलो होती.

आठवडाभरापूर्वीच सवलतीच्या दरात कांद्याची विक्री सुरू केली आहे. मात्र याअंतर्गत 35 रुपये किलो या सवलतीच्या दरात कांदा लोकांना उपलब्ध करून दिला जात आहे. तसेच राज्य सरकारने हा उपक्रम गेल्या 5 सप्टेंबरपासून सुरू केला आहे.

हेही वाचा:

सणा सुदीच्या मुहूर्तावर पुन्हा ग्राहकांना झटका

खुशखबर… दसरा-दिवाळीपूर्वी पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार

लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये वाद, प्रियकरानं प्रेयसीला संपवलं, मृतदेह रिक्षातून तिच्या आईच्या घरासमोर ठेवला