अर्जही एकाच दिवशी अन् सभेची तारीखही एकच; ‘शिवाजी पार्क’साठी मनसे- ठाकरे गटात रस्सीखेच!

राज्याच्या राजकारणात सध्या लोकसभा निवडणुकांची(online application) रणधुमाळी सुरू आहे. त्यामुळे लवकरच राज्यात प्रचाराच्या तोफा धडाडताना दिसणार आहेत. अशातच आता सभेसाठी शिवाजी पार्क मैदान मिळवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना ठाकरे गटाने एकाच दिवशी अर्ज केल्याने अन् सभेची तारीखही एक असल्याने नवा पेच निर्माण झाला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, 17 मे ला प्रचार सभेसाठी(online application) शिवाजी पार्क मैदान मिळावे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबई महापालिकेकडे अर्ज दाखल केला आहे. त्याच दिवशी म्हणजे १७ मेलाच शिवसेना ठाकरे गटानेही शिवाजी पार्कवर प्रचार सभा घेण्यासाठी पालिकेकडे परवानगी मागितली आहे. विशेष म्हणजे सभेची तारीखही एकच आहे आणि दोन्ही पक्षांनी एकाच दिवशी म्हणजे 18 मार्च रोजीच मुंबई पालिकेकडे अर्ज केला आहे.

त्यामुळे आता शिवाजी पार्कवर सभा घेण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाला परवानगी मिळणार की मनसेची सभा होणार याबाबत नवा पेच निर्माण झाला आहे. परंतु 17 मे ला शिवाजी पार्क मैदान मिळावं यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रथम अर्ज केला असल्याचं मुंबई महापालिकेने दिलेल्या इनवर्डनंबर वरून दिसत आहे. त्यामुळे नियमानुसार शिवाजी पार्क मैदान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाच मिळणार असा विश्वास पक्षाच्या नेत्यांना आहे. त्यामुळे आता १७ मे रोजी शिवाजी पार्कवर कोणाची तोफ धडाडणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

तत्पुर्वी, ९ एप्रिल रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाडवा मेळावा दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर होणार आहे. मनसे महायुतीत जाणार असल्याची चर्चा त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेली अमित शहांची भेट आणि आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने ही सभा महत्वाची ठरणार असून राज ठाकरे काय भूमिका घेतात? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा :

एप्रिल महिना सिनेरसिकांसाठी ठरणार खास, ३ जबरदस्त चित्रपट येणार भेटीला

वानखेडेमध्ये आज खरंच हार्दिकमुळे पोलीस चाहत्यांवर कारवाई करणार? MCA म्हणालं, ‘प्रेक्षकांच्या..’

‘शरद पवारांनी आदेश दिला तर मी..’; पृथ्वीराज चव्हाण अगदी स्पष्टच बोलले! राज्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट