मुंबई विद्यापीठात जपानी, जर्मनीचे ऑनलाइन अभ्यासक्रम

मुंबई(bombay) विद्यापीठात प्रथमच विद्यार्थ्यांना जपानी, जर्मन, चायनीज आदी भाषा शिकण्याची संधी उपलब्ध होणार आहे. यासाठी विद्यापीठाच्या जर्मन विभागाने पुढाकार घेतला असून यासोबत पदवी, पदव्युत्तर स्तरावर आणि पुढे पीएचडीसाठी जर्मन भाषेतून शिक्षण संशोधन करण्याचीही संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

जर्मन विभागाने नुकतेच जर्मन भाषेचे 4 ते 8 व्रेडिटचे अल्पकालीन ऑनलाइन अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू केले आहेत. यात नवशिक्यांसाठी 4 व्रेडिटचा डिप्लोमा तर 6 ते 8 व्रेडिटसाठी इंटरमेडिएट, अॅडव्हान्स डिप्लोमा आणि डिप्लोमा इन कमर्शियल अँड टेक्निकल ट्रान्सलेशन टुरिझम याचा समोवश आहे. तर यात दोन डिप्लोमा ऑफलाइन पद्धतीने कलिना संकुलात सुरू होतील.(bombay)
जपानी भाषेचेही पाच अभ्याससक्रम ऑनलाइन पद्धतीने असतील. यात जपानी भाषा प्रमाणपत्र (जेएलपीटी-एन5), डिप्लोमा (जेएलपीटी-एन4), अॅडव्हान्सड् डिप्लोमा-1 (जेएलपीटी-एन5), अॅडव्हान्सड् डिप्लोमा-2 (जेएलपीटी-एन2) आणि डिप्लोमा इन बिझनेस जपानीस् या अभ्यासक्रमाचा समावेश आहे.

यासोबतच चायनीज मँडरिम हा एचएसके लेव्हलचा 2 व्रेडिटचा आणि एचएसके लेव्हल-2 हा 2 व्रेडिडचा ऑनलाइन अभ्यासक्रम आहे. यासोबतच कम्युनिकेटिव्ह मराठीचा प्रमाणपत्र आणि डिप्लोमा स्तरावरील दोन अभ्यासक्रम ऑनलाइन अनुक्रमे 4 आणि 6 व्रेडिटचे हे ऑनलाइन अभ्यासक्रम आहेत, अशी माहिती जर्मन विभागाच्या प्रमुख डॉ. विभा सुराणा यांनी दिली.

हेही वाचा :

समर स्पेशलमुळे लोकल सेवा विलंबाने; मुंबईकर त्रस्त

हे सरकार काळ्या आईशी इमान राखणाऱया शेतकऱयांचे नाही!

महादेव बेटिंग ऍप्स प्रकरण – अभिनेता साहील खानला अटक;