महाराष्ट्रात एनडीएला मोठा धक्का बसू शकतो. राज्यात भाजप, एकनाथ (Maharashtra)शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला एकूण ४८ पैकी केवळ १२ जागा मिळण्याची अपेक्षा आहे.लोकसभा निवडणुकांच्या निकाल जसे जवळ येत आहेत. तशी लोकांची उत्सुकता देखील वाढली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी उद्या (शनिवार, १ जून) शेवटच्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. त्यानंतर ४ तारखेला निकाल लागणार आहेत. यावेळी संपूर्ण देशाचे लक्ष महाराष्ट्राच्या निकालावर आहे. महाराष्ट्रात झालेले राजकीय भूकंप याला कारण ठरत आहेत. दोन शिवसेना, दोन राष्ट्रवादी आणि भाजप अशी राजकीय परिस्थिती राज्यात आहे.
लोकसभा निवडणुकांबाबत अनेक राजकीय अंदाज येत आहेत. हे अंदाज नेहमी खरे नसतात पण कधी कधी बरोबर पण येतात. एका तज्ज्ञांनी भाजपबाबात धक्कादायक दावा केला आहे. यावेळी भाजपला २५० जागाही मिळवता येणार नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. रवी श्रीवास्तव यांनी भाजपबद्दल मोठा दावा केला आहे. यावेळी भाजपला फक्त २४० जागा मिळतील. तर दोन राज्यात पक्षाला चांगली कामगिरी करता येणार नाही. तर मित्रपक्षांना ३० जागा मिळणार आहेत. एकूण २७० जागा भाजप आणि एनडीएच्या खात्यात जातील.
रवी श्रीवास्तव यांनी इंडिया आघाडी भारताला २५९ जागा मिळण्याची शक्यता(Maharashtra) वर्तवली आहे. तर १२९ जागा एकट्या काँग्रेसच्या वाट्याला जातील, तर १३० जागा इंडिया आघाडीच्या खात्यात जाताना दिसत आहेत. अशाप्रकारे विरोधकांकडे २५९ जागांचा आकडा असेल. ५४३ पैकी २३ जागा इतर पक्षांना जातील. दक्षिण भारत, दिल्ली आणि बिहारमध्ये एनडीएपेक्षा भारत आघाडीला जास्त जागा मिळतील, असा अंदाज रवी श्रीवास्तव यांनी व्यक्त केला आहे.
यावेळी भाजपला दोन राज्यात जोरदार झटका बसण्याचा अंदाज राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. दिल्लीतील सात जागांपैकी भाजपला एकही जागा जिंकता येणार नाही, तर दक्षिण भारतातील तामिळनाडूच्या जागेवर भाजपला एकही जागा मिळणार नाही, असा दावा रवी श्रीवास्तव यांनी केला.
दिल्लीच्या सर्व जागा इंडिया आघाडीकडे जातील. काँग्रेस तीन जागा जिंकेल आणि आम आदमी पार्टी आप चारही जागा जिंकेल. तामिळनाडूतील ३९ जागांपैकी १७ जागा द्रविड मुन्नेत्र कळघमकडे जातील,(Maharashtra) तर काँग्रेस ७ आणि इंडिया आघाडी १४ जागा जिंकेल. कर्नाटकमध्ये काँग्रेस भाजपपेक्षा पुढे असेल. २८ पैकी ६ जागा भाजपला आणि एक जागा जनता दल सेक्युलरच्या वाट्याला जाईल.
हेही वाचा :
महाराष्ट्रातील ‘या’ भागात आज मुसळधार पावसाचा इशारा
लोकांनी आमच्याकडून अपेक्षा ठेवू नये…; वर्ल्डकपपूर्वीच असं का म्हणतोय विराट कोहली?
मुलाच्या लग्नासाठी घेतले होते उधार पैसे, प्रसिद्ध निर्मात्याचा कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप