मुश्रीफांसारख्या महाशक्तीच्या विरोधात उभारायचे धाडस फक्त ‘या’च व्यक्तीमध्ये

कागल : हसन मुश्रीफ म्हणतात की मला पाडणारा अजून जन्माला यायचा आहे. मुश्रीफ साहेब(political articles) लोकशाहीत एवढी मस्ती बरी नाही. आमचा मुश्रीफांच्या प्रवृत्तीला विरोध आहे, असे म्हणत पंचायत समितीचे माजी सभापती दत्तोपंत वालावलकर यांनी अजित पवार गटाचे उमेदवार हसन मुश्रीफांवर तोफ डागली. या प्रसंगी सेनापती कापशी येथील व परिसरातील वलयांकित नेतृत्व, पंचायत समितीचे माजी सभापती दत्तोपंत वालावलकर यांच्यासह 25 गावातील कार्यकर्त्यांनी राजे समरजितसिंह घाटगे यांना या निवडणुकीत पाठिंबा दिला. त्यावेळी ते बोलत होते.

वालावलकर म्हणाले, साके येथील एका कार्यक्रमात(political articles) संजय घाटगे यांनी हसन मुश्रीफांना पाठिंबा देण्याचे जाहीर केले. त्यांच्या या निर्णयाबद्दल दुसऱ्या दिवशी त्यांना भेटून त्यांनी घेतलेल्या निर्णयास आमचा पाठिंबा नसल्याचे सांगितले. दौलत से नही,ताकत से नही, मोहब्बत से दुनिया चलती है. याप्रमाणे 25 गावातील कार्यकर्त्यांना भेटून भूमिका सांगितली. मुश्रीफांसारख्या प्रवृत्तीसोबत जाण्याचे विचार पटले नाहीत. म्हणून आम्ही राजे समरजितसिंह घाटगे पाठिंबा दिला. असंही त्यांनी नमुद केलं.

समरजितसिंह घाटगे, उच्चशिक्षित, पारदर्शक नेतृत्व असून त्यांच्या विजयासाठी एकसंधपणाने लढूया. राजेनी मुश्रीफांसारख्या महाशक्तीच्या विरोधात उभारायचे धाडस केले. याचे करावे तेवढे कौतुक थोडे आहे. लोकशाही जिवंत राहण्यासाठी. भयमुक्त समाजासाठी राजेसाहेब तुम्ही निवडून येणे गरजेचे आहे. विरोधी बाजूने पैशाचा पाऊस पडत आहे. मुश्रीफ चंद्र सूर्य सोडून सगळे देतील. मात्र स्वाभिमानी जनतेने लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी त्यांचा पराभव करणे आवश्यक आहे.‌

राजे समरजीतसिंह घाटगे म्हणाले, ” कागल गडहिंग्लज उत्तुरच्या परिवर्तनास दत्तोपंत वालावलकर यांच्यासह २५ गावातील कार्यकर्त्यांनी मला आशीर्वाद दिल्याबद्दल आभारी आहे. तुमचे आमचे राजकीय मतभेद झाले असतील पण आपण मनाने एक आहोत. मला तुम्ही पाठिंबा नव्हे तर आशीर्वाद दिला आहे.

आपण एकमेकांशी विरोधात काम केले. पण मनभेद कधी झाले नाहीत. आमचा विरोध मुश्रीफांना नाही त्यांच्या विचारधारेला विरोध आहे. शरद पवार साहेबांचा विचार या मतदार संघात परत आणूया. हसन मुश्रीफ हे कधीच पुरोगामी नव्हती. त्यांनी पुरोगामीचा बुरखा पांगरला होता. कागल, गडहिंग्लज, उत्तुर मतदारच त्यांना पाडायला जन्माला आले आहेत.

हेही वाचा :

धनंजय महाडिकांना लाडक्या बहिणींबद्दलचे ‘ते’ वक्तव्य भोवलं

“राहुल प्रकाश आवाडे यांच्या प्रचारासाठी आज इचलकरंजीत जोशपूर्ण सभा”

भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध होताच अमित शाह उद्धव ठाकरेंवर कडाडले