लातूर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील रक्कम ही पात्र लाभार्थी महिलांच्या आधार संलग्न बँक(bank near me) खात्यात जमा करण्यात येते. त्यामुळे योजनेसाठी पात्र ठरलेल्या प्रत्येक महिलेचे बँक खाते आधार संलग्न असणे गरजेचे आहे. अद्याप ज्या महिलांनी आपले बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न (आधार लिंक) केलेले नाही, अशा महिलांनी आपले खाते असलेल्या बँकेत जावून आधार क्रमांक संलग्न करून घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी लातूर जिल्ह्यात आतापर्यंत जवळपास ५ लाख अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी पहिल्या टप्प्यात २ लाख ६७ हजार महिला योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत. तसेच काही अर्जामध्ये त्रुटी असल्याने हे अर्ज दुरुस्तीसाठी परत पाठविण्यात आले होते. दुसऱ्या टप्प्यात प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी प्रक्रिया गतीने सुरु आहे. पहिल्या टप्प्यात पात्र ठरलेल्या, तसेच दुसऱ्या टप्प्यात अर्ज केलेल्या अनेक महिलांच्या बँक खात्याला आधार क्रमांक जोडलेले नसल्याचे निदर्शनास आले आहे.
आधार संलग्न बँक(bank near me) खात्यावरच योजनेची रक्कम जमा होणार असल्याने अशा महिलांनी आपले खाते ज्या बँकेत आहे, अशा बँकेत जावून आपल्या बँक खात्याला आधार क्रमांक जोडण्याची कार्यवाही करावी. आधारकार्डची झेरोक्स प्रत आणि बँकेत उपलब्ध असलेला विहित नमुन्यातील अर्ज भरावा, असे आवाहन करण्यात आले.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये सरकारकडून दिले जात आहेत. महाराष्ट्र सरकारने 17 ऑगस्टपासून पात्र महिलांच्या खात्यात पैसे टाकण्याचे सुरु केले आहे. राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना आर्थिक मदत करणे हा या योजनेचा उद्देश आहे. याअंतर्गत एक कोटींहून अधिक महिलांना दरमहा 1,500 रुपयांची मदत मिळणार आहे.
हेही वाचा:
मालवणचा राजकोट आणि राजकारण्यांचा येळकोट!
राज्यात पावसाचा जोर आणखी वाढणार; ‘या’ जिल्ह्यांना आज यलो अलर्ट
मेल्यासारखं जगण्यापेक्षा….आदल्या रात्री फेसबुकवर पोस्ट, दुसऱ्या दिवशी तलावात बॉडी