OpenAI लाँच करणार गुगलला टक्कर देणारं सर्च इंजिन!

ChatGPT नंतर आता OpenAI नवीन धमाका(search engine) करण्यास सज्ज आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, OpenAI गुगलच्या वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी सर्च इंजिन लॉन्च करण्याची योजना आखत आहे.

जिमी ऍपल्सने दावा केला आहे की OpenAI 9 मे रोजी एका भव्य कार्यक्रमात हे नाविन्यपूर्ण (search engine)सर्च इंजिन सादर करणार आहे. कंपनीने या कार्यक्रमासाठी आवश्यक ते कर्मचारी नियुक्ती करण्यास सुरुवात केली आहे.

अंदाज वर्तवला जात आहे की OpenAI चं हे नवीन सर्च इंजिन Bing च्या पायाभूत सुविधांवर आधारित असेल, जे मायक्रोसॉफ्टचं सर्च इंजिन आहे. OpenAI च्या CEO, Sam Altman यांनी Lex Fridman च्या पॉडकास्टमध्ये या संभाव्यतेची पुष्टी करणारी माहिती दिली होती.

हे OpenAI आणि Google मधील स्पर्धा अधिकाधिक वाढवू शकत. Google सध्या जगभरात सर्वाधिक वापरलं जाणारं सर्च इंजिन आहे; परंतु OpenAI च्या AI क्षमतेमुळे ते Google साठी आव्हान बनू शकतं.

-ओपन एआयचं शक्तिशाली AI मॉडल अधिक प्रासंगिक आणि अचूक शोध परिणाम देऊ शकतं.

-OpenAI वापरकर्त्याच्या गरजेनुसार शोध परिणाम दर्शवण्यासाठी आणि अधिक पर्सनलाइज्ड एक्सपिरीयन्स देण्यासाठी AI चा वापर करू शकतं.

-OpenAI गुगलच्या तुलनेत AI-संचालित अशी अनेक नवीन सर्च ऑप्शन देऊ शकतं.

-OpenAI चं सर्च इंजिन Google ला कशी टक्कर देतं हे पाहणं मनोरंजक ठरेल. हा प्रयोग यशस्वी झाल्यास, इंटरनेट वापरण्याच्या पद्धतीत नवीन क्रांती घडण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

Amazon-Flipkart चा धमाकेदार सेल सुरू

‘होय, मी Cheat केलंय…’, समांथाच्या Ex पतीची कबुली

काेल्हापूर हातकणंगले मतदारसंघात तीन दिवसांत प्रचाराचा अक्षरश: उडणार धुरळा !