कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : कोल्हापूर शहराच्या हद्द वाढीचा विषय सामंजसियांनी सोडवा असे आवाहन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार (leaders)यांनी शुक्रवारी कोल्हापुरात बोलताना केले आहे. त्यामुळे हद्द वाढ कृती समितीच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. मात्र हद्द वाढविरोधी कृती समितीने कडवा विरोध केल्याने आता शहर विरुद्ध ग्रामीण परिसर असा एक संघर्ष उभा राहताना दिसतो आहे.

हद्दवाडीला ज्यांचा विरोध आहे आणि ज्यांचे हद्द वाढविरोधी कृती समितीला अप्रत्यक्ष समर्थन आहे त्या लोकप्रतिनिधींच्या अपयशाचा पंचनामाच सध्या सुरू आहे. कोल्हापूर शहराच्या हद्द वाढीला विरोध करताना आपणच आपल्या अपयशाचा पाढा वाचतो आहे हे संबंधितांच्या लक्षात कसे काय येत नाही? असा सवाल सध्या कोल्हापुरात उपस्थित होतो आहे.
कोणत्याही शहराचा विकास हा त्या शहराची हद्द वाढ झाल्याशिवाय होत नाही असा सिद्धांत उपमुख्यमंत्री(leaders) अजितदादा पवार यांनी याच कोल्हापुरात दिड दोन वर्षांपूर्वी मांडला होता. त्यानंतर हसन मुश्रीफ यांनी हद्द वाढीचा विषय त्यांच्या प्राधान्यक्रमांत घेतला होता. किमान पाच-सहा गावांचा कोल्हापूर शहराचा समावेश करण्याचा त्यांनी निर्धारही केला होता, पण तो त्यांना तडीस नेण्यात काही अडथळे आले.
कोल्हापूर महापालिका प्रशासन हे कोल्हापूरच्या जनतेला सक्षमपणे मूलभूत सुविधा देत नाही तर मग हद्दीत येणाऱ्या गावांना काय सुविधा मिळणार? असा एकच प्रश्न आणि एकच युक्तिवाद हद्दवाढ विरोधी कृती समितीकडून गेल्या काही वर्षांपासून केला जातो आहे आणि याच कृती समितीला काही लोकप्रतिनिधींचे छुपे तर काहींचे उघड समर्थन मिळताना स्पष्ट होते आहे.
कोल्हापूर शहराची हद्द वाढ होता कामा नये या एका मागणीवर सतेज पाटील आणि अंमल महाडिक या पारंपारिक राजकीय शत्रूंचे एक मत झाले आहे. आमदार आम्हाला महाडिक यांच्या कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात महापालिकेचे 28 प्रभाग येतात. आता त्यांनी हद्दवाढ विरोधी कृती समितीला आपले समर्थन दिले आहे. आमदार आम्हाला महाडिक यांचे पिताश्री माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्याकडे कोल्हापूर महापालिकेची तब्बल 18 वर्षे सत्ता होती, हुकूमत होती आणि काही काळ त्यांच्यासोबत सतीश पाटील हे सुद्धा होते. याचा अर्थ अमल महाडिक यांच्या पिता श्रेणी म्हणजे महादेवा महाडिक यांनी कोल्हापूर शहराला मूलभूत सुविधा सक्षमपणे दिल्या नाहीत. कोल्हापूरचा त्यांच्याकडून विकास झाला नाही असा होतो. एक प्रकारे ते आपल्याच पिताश्रींच्या अपयशाचा अप्रत्यक्षपणे पंचनामा करत आहेत. असे म्हणता येईल.

महादेवराव महाडिक(leaders) यांच्या हातून कोल्हापूर महापालिकेची सत्ता काँग्रेसचे सतेज पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे हसन मुश्रीफ यांनी काढून घेतली. या दोघांची कोल्हापूर महापालिकेत आघाडी होती आणि ती आजही आहे असे म्हणता येईल. जवळपास पंधरा वर्षे काँग्रेस आघाडीची सत्ता महापालिकेत आहे. आणि या आघाडीने गेल्या पंधरा वर्षात कोल्हापूर वासियांना चांगल्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिलेल्या नाहीत. कोल्हापूर शहराचा त्यांनी विकास केलेला नाही. कोल्हापूर शहर म्हणजे एक मोठे खेडे अशी ओळख याच मंडळींनी उर्वरित महाराष्ट्राला करून दिली आहे असे ठामपणे म्हणता येईल. कारण याच मंडळींचा कोल्हापूर शहराच्या हद्द वाढीला विरोध आहे.
म्हणजे एकीकडे कोल्हापूर शहराचे नेतृत्व करायचे आणि दुसरीकडे या शहराला हद्द वाढ होण्यापासून वंचित ठेवायचे अशी दुहेरी नीती काँग्रेस आघाडीच्या नेत्यांनी अवलंबलेली आहे. आणि हद्दवाढ विरोधी कृती समितीचे यावर एकमत आहे. शहराचा विकास झालेला नाही, शहरवासीयांना मूलभूत सुविधा मिळत नाहीत हा त्यांचा युक्तिवाद आहे. म्हणजेच शहराच्या हद्द वाढीला ज्यांचा विरोध आहे, ज्यांनी हद्द वाढ विरोधी कृती समितीला समर्थन दिले आहे त्यांच्याच अपयशाचा पंचनामा हद्दवाढ विरोधी कृती समितीकडून सुरू आहे. ही नेते मंडळी किंवा लोकप्रतिनिधी आपले अपयश स्पष्टपणे कबूल करत आहेत असाही त्याचा अर्थ होतो आहे.
कोल्हापूर शहर हद्दवाढ कृती समितीने आता आरपारची लढाई करण्याचा निर्धार केला आहे. संपूर्ण शहरात त्याबद्दल जनजागृती केली जाते आहे. पोस्टरबाजी सुरू आहे. हद्दवाढ घेतल्याशिवाय शांत बसणार नाही असा निर्माणीचा इशारा कृती समितीने दिला आहे. नजीकच्या काळात कृती समितीकडून एक उग्र आंदोलन उभे करण्याचा विचार सुरू आहे. तर हद्द वाढीला सर्व ताकतीनिशी विरोध करायचा असा निर्धार हद्द वाढविरोधी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे कधी नव्हे तो कोल्हापूर शहर विरुद्ध हद्द वाढीत येणारी गावे असा संघर्ष नजीकच्या काळात उभा राहणार आहे.
हेही वाचा :
होळी सणानिमित्त प्रवाशांसाठी खुशखबर!
इथून पुढे विचारू नका Who Is Dhangekar?; हाती ‘धनुष्य’ घेण्यापूर्वीच पवारांच्या नेत्यानं पेटवली वात
आजपासून ‘या’ 3 राशींचे स्वप्न सत्यात उतरणार! अष्टदशा योग पैशांचा पाऊस पाडणार, नोकरीत प्रमोशन