महायुतीचा आज संध्याकाळी शपथविधी पार पडणार आहे. मात्र अद्यापही एकनाथ शिंदे(political career) उपमुख्यमंत्रीपद स्विकारणार आहेत की नाही हे स्पष्ट नाही. त्यातच उदय सामंत यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. निमंत्रण पत्रिका बाबतीत एकत्र बसून निर्णय घेतला होता. आम्ही शासनाच्या फॉरमॅट नुसार छापली आहे. एक तासाभरात निर्णय स्पष्ट होईल. साहेब उपमुख्यमंत्री स्वीकारणार की नाही ते स्पष्ट होईल अशी माहिती उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
“एकनाथ शिंदे यांनी जर उपमुख्यमंत्रीपद(political career) स्विकारलं नाही आणि आमच्यापैकी कोणावर जबाबदारी टाकण्याचा प्रयत्न केला तर आम्हीदेखील ते स्विकारणार नाही अशी आमची भूमिका आहे. एकनाथ शिंदे यांना आम्ही आमच्या भावना सांगितल्या आहेत. सगळ्यांचं राजकीय करिअर त्यांच्या हातात दिलं आहे. त्यामुळे त्यांना डावलून काही केलं जात असेल तर शांत बसणार नाही,” असं उदय सामंत यांनी सांगितलं आहे.
“अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. आमची स्पष्ट भूमिका आहे की एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री शपथ घ्यावी. आम्ही कोणीही उपमुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक नाही. एकनाथ शिंदेच उपमुख्यमंत्री होतील अशी खात्री आहे. जर त्यांनी पद स्वीकारलं नाही तर आम्हीही कोणतेही पद स्वीकारणार नाही. पण तेच उपमुख्यमंत्री पद स्वीकारतील असा विश्वास आहे,” असं उदय सामंत म्हणाले आहेत.
“आमचं करिअर त्यांच्या हातात आहे. त्यांना डावलून कोण काही करत असेल तर ते अयोग्य आहे. काही जण चुकीच्या बातम्या पसरवत आहेत. चुकीच्या बातम्या पसरवणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करणार. भाजपाच्या मुख्यमंत्र्यांला पाठिंबा देणार हे आम्ही स्पष्ट केलं आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री होणं हे जनतेची गरज आहे,” असंही त्यांनी सांगितलं आहे.
निमंत्रण पत्रिका बाबतीत एकत्र बसून निर्णय घेतला होता. आम्ही शासनाच्या फॉरमॅट नुसार छापली आहे. एक तासाभरात निर्णय स्पष्ट होईल. साहेब उपमुख्यमंत्री स्वीकारणार की नाही ते स्पष्ट होईल असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. कॅबिनेटमध्ये जर शिंदे नसतील तर कोणीही कॅबिनेटमध्ये नसेल अशी भूमिका आपली आहे का? असं विचारल असता आमही नकारात्मक विचार करत नाही, आम्हाला खात्री आहे ते शपथ घेतीलीच असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा :
एक दोनदा नाही तर अनेकदा प्रेमात पडतात ‘या’ जन्मतारखेचे लोक
टीम इंडियासाठी सर्वात मोठी Good News!
रेल्वेस्थानकावर गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडने प्रवाशांसमोर केलं असं…लज्जास्पद Video Viral