पंतचा गुजरातला तडाखा! होमग्राउंडवर 4 धावांनी विजय

दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियमवर आयपीएल 2024 च्या 40 व्या सामन्यात ऋषभ पंतच्या दिल्ली कॅपिटल्ससमोर(delhi capitals), तगड्या गुजरात टायटन्सचे आव्हान असणार आहे.


आयपीएल 2024 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा (delhi capitals)हाल थोडा बेहाल झालेला आहे. दिल्लीने आतापर्यंत एकूण 8 सामने खेळलेले आहेत आणि त्यातून फक्त 3 सामने डिसी जिंकू शकलेली आहे. तर गुजरात टायटन्सचे हाल पण दिल्लीसारखेच आहेत, गुजरातच्या संघाचे प्रदर्शनसुद्धा एवढे खास राहिलेले नाही. गुजरात टायटन्सने आतापर्यंत झालेल्या 8 सामन्यात फक्त 4 सामने जिंकलेले आहेत. तर आज दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियममध्ये कोणता संघ वरचढ ठरेल हे बघण्यायोग्य असणार आहे.
24 Apr 2024, 22:56 वाजता
डेविड मिलरच्या विकेटमुळे गुजरातच्या जिंकण्याच्या आशा आता पूर्णपणे संपल्या आहेत, कारण 18 व्या ओव्हरमध्ये मिलर हा 55 धावांवर आउट झाला आहे.

24 Apr 2024, 22:52 वाजता
गुजरातच्या डेविड मिलरने अजूनही जिंकण्याच्या आशा कायम ठेवल्या आहेत. 17 व्या ओव्हरमध्ये मिलरने 21 बॉलमध्ये 5 चौके आणि 3 षटकारांच्या मदतीने आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे.

24 Apr 2024, 22:45 वाजता
कुलदीप यादवच्या 16 व्या ओव्हरमध्ये गुजरातचा धाकड फलंदाज राहूल तेवतिया हा फक्त 4 धावा करून आउट झाला आहे. सहाव्या विकेटनंतर गुजरातच्या जिंकण्याच्या आशा थोड्या कमी झाल्या आहेत, तरी मिलर हा अजूनही नाबाद आहे.

24 Apr 2024, 22:38 वाजता
15 ओव्हरनंतर गुजरात टायटन्सचा स्कोर 147-5 असा आहे. डेविड मिलर आणि राहूल तेवतिया हे दोघं फलंदाज मैदानावर फलंदाजी करतायेत, गुजरातला या स्थितीतून 30 बॉलमध्ये 78 रन जिंकण्यासाठी लागत आहे.

24 Apr 2024, 22:36 वाजता
रसिख सलामने 15 व्या ओव्हरमध्ये शाहरूख खानला 8 धावांवर आउट केलं आहे. पाचव्या विकेटनंतर राहूल तेवतिया हा फलंदाजीसाठी आला आहे.

24 Apr 2024, 22:27 वाजता
13 व्या ओव्हरमध्ये गुजरातचा भरवश्याचा फलंदाज साई सुदर्शन हा 65 धावांवर बाद झाला आहे. गुजरातला आता 42 बॉलमध्ये 98 धावांची गरज आहे, तर चौथ्या विकेटनंतर शाहरूख खान हा फलंदाजीसाठी आला आहे.

24 Apr 2024, 22:14 वाजता
10 व्या ओव्हरमध्ये गुदरातला मोठा धक्का बसला आहे, सेट फलंदाज वृद्धिमान साहा हा 39 धावांवर कुलदिप यादवच्या बॉलिंगवर आउट झाला आहे. तर 10 व्या ओव्हरमध्येच साई सुदर्शनने आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे आणि 10 ओव्हरच्या समाप्तीनंतर गुजरातचा स्कोर 98-2 असा आहे.

24 Apr 2024, 21:49 वाजता
5 ओव्हरनंतर गुजरात टायटन्सचा स्कोर 60-1 असा आहे. वृद्धिमान साहा हा 31 धावांवर खेळतोय, तर साई सुदर्शन हा 22 धावांवर नाबाद आहे, या स्थितीतून गुजरातला 90 बॉलमध्ये 165 धावांची गरज आहे.

24 Apr 2024, 21:44 वाजता
दुसऱ्या ओव्हरमध्ये, नॉर्खियाने गुजरातचा कॅप्टन शुभमन गिल याला 6 धावांवर आउट केलं आहे. पहिल्या विकेटनंतर साई सुदर्शन हा फलंदाजीसाठी आला आहे.

24 Apr 2024, 21:13 वाजता
20 ओव्हरनंतर दिल्ली कॅपिटल्सने, गुजरात टायटन्ससमोर 225 धावांचे आव्हान दिलं आहे. दिल्लीकडून अक्षर पटेल याने 66 धावांची दमदार इनिंग खेळलीये, तर डिसीचा कॅप्टन ऋषभ पंत यानेसुद्धा 88 धावांची नाबाद खेळी खेळली आहे. तर शेवटी ट्रिस्टन स्टब्स याने फटकेबाजी करून 27 धावांचे महत्वपूर्ण योगदान दिले आहे. गुजरातकडून संदिप वॉरिअरने सर्वात जास्त 3 विकेट्स घेतल्याये, तर नूर अहमदने एक विकेट घेतलेली आहे.

तर आता गुजरात टायटन्स चे फलंदाज ह्या 224 धावांचा डोंगराला कसे पार करतात हे बघण्यायोग्य ठरणार आहे.

24 Apr 2024, 20:57 वाजता
17 व्या ओव्हरमध्ये नूर अहमदच्या गोलंदाजीवर अक्षर पटेल हा 66 धावांवर आउट झाला आहे. अक्षरच्या विकेटनंतर ट्रिस्टन स्टब्स हा फलंदाजीसाठी आला आहे. ऋषभ पंत याने 34 बॉलमध्ये आपलं अर्धशतकसुद्धा पूर्ण केलं आहे.

हेही वाचा :

कोल्हापूरची निवडणूक सोशल मीडियावरही तापली

मराठमोळ्या प्राजक्ताचा वेस्टर्न आऊटफिट लूक पाहून चाहते घायाळ म्हणाले…

मुंबई इंडियन्सकडून फिक्सिंग? डग आऊटमधून इशारा केल्यानंतर अंपायरने बदलला निर्णय?