देशात सध्या ‘लिव्ह-इन-रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्यांची संख्या वाढताना दिसत आहे(Parents). त्यानुसार, सरकारकडून आता विशेष पावले उचलली जात आहे. त्यात आता उत्तराखंडमध्ये 18 ते 21 वर्षांदरम्यान असलेल्या तरुणांच्या नात्यासंबंधी त्यांच्या पालकांना माहिती देण्यात येईल, अशी तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे आता तुम्ही ‘लिव्ह-इन-रिलेशनशिप’मध्ये राहणार हे आता पालकांनाही समजणार आहे.
उत्तराखंड सरकारने समान नागरी कायद्याची (यूसीसी) अंमलबजावणी करण्यासाठी नऊ सदस्यांची समिती स्थापन केली होती. 6 फेब्रुवारी रोजी विधानसभेत राज्याचे प्रस्तावित समान नागरी कायदा विधेयक मांडले गेले(Parents). स्वातंत्र्यानंतर यूसीसी लागू करणारे देशातील पहिले राज्य ठरले. या कायद्यातील तरतुदींसंदर्भात माहिती देणारे दस्ताऐवज शुक्रवारी अधिकृत संकेतस्थळावर अपलोड करण्यात आले. ‘लिव्ह इन रिलेशनशिप’बद्दल केलेल्या तरतुदीवर वाद होऊ शकतो.
ऑक्टोबरमध्ये समान नागरी संहिता लागू होणार
समान नागरी संहितेच्या अटी आणि नियमांबद्दल माहिती देताना मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले, की ऑक्टोबरमध्ये यूसीसी लागू करायची आहे. त्यादृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे आम्ही कायद्याच्या मसुद्यावर काम करत आहोत.
धार्मिक गटांनी घेतला आक्षेप
धार्मिक गटांनी आक्षेप घेतला. आम्ही यावर विचार करत आहोत आणि मुस्लिम आणि हिंदू धर्मग्रंथांचा अभ्यास करून त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहोत. लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या जोडप्यांची नोंदणी केल्यामुळे त्यांना सुरक्षा प्रदान केली जाईलच.
हेही वाचा :
वॉचमन चा मुलगा झाला चार्टर्ड अकाउंटंट (सीए)
देशातील तरुणांसाठी खुशखबर! बेरोजगारीच्या संकटात टाटांनी दाखवलं मोठं मन
शाहू महाराज विशाळगडाकडे रवाना, सतेज पाटीलही सोबतीला; 19 जुलैला एमआयएमचा कोल्हापुरात मोर्चा