पॅरिस ऑलिम्पिक (olympics) स्पर्धा २६ जुलै २०२४ पासून सुरू होत आहे, आणि भारतीय खेळाडूंनी या स्पर्धेसाठी कंबर कसली आहे. भारतीय चमूत एकूण ११७ खेळाडूंचा समावेश आहे, ज्यात ७० पुरुष आणि ४७ महिला खेळाडू आहेत. मागील टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताने एका सुवर्ण पदकासह सात पदकं जिंकली होती, आणि आता याहून अधिक पदकं जिंकण्याची अपेक्षा आहे. भारताचे ११७ खेळाडू ६९ क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होणार आहेत, आणि या खेळाडूंच्या निवडीमध्ये हरयाणा आणि पंजाब या दोन राज्यांमधून सर्वाधिक खेळाडूंची निवड झाली आहे.
या दोन राज्यांमधून एकूण ४२ खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. हरयाणातून २४, तर पंजाबमधून १८ खेळाडूंची निवड झाली आहे. ११७ खेळाडूंच्या चमूत एकूण २२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील खेळाडूंचा समावेश आहे.
प्रमुख खेळाडूंची नावे: (olympics)
हरयाणा:
- भजन कौर – तिरंदाजी
- किरण पहल – ऍथलेटिक्स
- नीरज चोप्रा – ऍथलेटिक्स
- अमित पंघल – बॉक्सिंग
- जास्मिन लॅम्बोरिया – बॉक्सिंग
- निशांत देव – बॉक्सिंग
- प्रीती पवार – बॉक्सिंग
- दीक्षा डागर – गोल्फ
- संजय – पुरुष हॉकी संघ
- सुमित – पुरुष हॉकी संघ
- बलराज पनवार – रोईंग
- अनिश भानवाला – नेमबाजी
- मनू भाकर – नेमबाजी
- रमिता जिंदाल – नेमबाजी
- राइझा ढिल्लन – नेमबाजी
- रिदम सांगवान – नेमबाजी
- सरबज्योत सिंग – नेमबाजी
- सुमित नागल – टेनिस
- अमन सेहरावत – कुस्ती
- अंशू मलिक – कुस्ती
- अंतीम पंघल – कुस्ती
- निशा दहिया – कुस्ती
- रितिका हुड्डा – कुस्ती
- विनेश फोगट – कुस्ती
पंजाब:
- अक्षदीप सिंग – ऍथलेटिक्स
- तजिंदरपाल सिंग तूर – ऍथलेटिक्स
- विकास सिंग – ऍथलेटिक्स
- गगनजीत भुल्लर – गोल्फ
- गुरजंत सिंग – पुरुष हॉकी संघ
- हार्दिक सिंग – पुरुष हॉकी संघ
- हरमनप्रीत सिंग – पुरुष हॉकी संघ
- जर्मनप्रीत सिंग – पुरुष हॉकी संघ
- जुगराज सिंग – पुरुष हॉकी संघ (राखीव)
- कृष्ण बहादूर पाठक – पुरुष हॉकी संघ (राखीव)
- मनदीप सिंग – पुरुष हॉकी संघ
- मनप्रीत सिंग – पुरुष हॉकी संघ
- समशेर सिंग – पुरुष हॉकी संघ
- सुखजीत सिंग – पुरुष हॉकी संघ
- अंजुम मौदगिल – नेमबाजी
- अर्जुन चीमा – नेमबाजी
- सिफ्ट कौर समरा – नेमबाजी
- संदीप सिंग – नेमबाजी
- प्राची चौधरी कालियार – ऍथलेटिक्स (राखीव)
भारतीय दलातील शटलर तनिषा क्रास्टो ही एकमेव खेळाडू अशी आहे की, तिचा जन्म देशाबाहेर झाला आहे. तनिषाचा जन्म दुबईत झाला आहे.
पॅरिस ऑलिम्पिकसाठी (olympics) भारताचे खेळाडू आपले सर्वोत्तम प्रदर्शन करण्यासाठी सज्ज आहेत. या ११७ खेळाडूंच्या चमूत सर्व राज्यांतील खेळाडूंचा समावेश आहे, ज्यांनी आपल्या राज्याचे आणि देशाचे नाव उंचावण्यासाठी मेहनत घेतली आहे.
हेही वाचा :
NEET-UG चा सुधारित अंतिम निकाल जाहीर: सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सुधारणा
कोल्हापूर-गगनबावडा मार्गावरील बालिंगा पुलावरून वाहतूक बंद
कोल्हापुरला वाचवण्यासाठी सतेज पाटलांनी गाठले कर्नाटक