राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार(political updates) आज 84 वर्षांचे झालेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे पुतणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या. त्यानंतर अजित पवार कुटुंबासह शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पोहोचले होते.
दिल्लीतील सहा जनपथ या शरद पवार(political updates) यांच्या निवासस्थानी आज अजितदादांनी शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीचं निमित्त शरद पवारांचा 85 वा वाढदिवस ठरलाय. अजित पवार हे खातेवाटपाच्या चर्चेसाठी दिल्लीला गेलेले आहेत. दरम्यान त्यांनी आज आपले काका शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी थेट त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी धाव घेतली.
यावेळी अजित पवार यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, पार्थ पवार, प्रफुल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ देखील उपस्थित होते. याअगोदर दहा दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल पटेल यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. आजच्या काका-पुतण्याच्या भेटीमुळे राष्ट्रवादीच्या गोटात नेमकं काय चाललंय? अशी चर्चा रंगलेली आहे.
या भेटीमुळे आता अजित पवार आणि शरद पवार पुन्हा एकत्र येणार का? या चर्चा रंगल्या आहेत. अनेक तर्क-वितर्क देखील लावले जात आहेत. महाराष्ट्राकडे पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्या दृष्टीने पाहिल्यास, जोपर्यंत शरद पवार महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय आहेत. तोपर्यंत त्यांच्यासाठी एक छुपं आव्हान आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार शरद पवारांना सोबत घेऊन येऊ शकले किंवा शरद पवारांच्या खासदारांना सोबत घेऊन येऊ शकले.
तर, नरेंद्र मोदी यांचं सरकार मजबूत होईल. चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्यापैकी एकाची गरज त्यांच्या दृष्टीने संपेल मोदींचं सरकार हे स्वबळावर जाण्याच्या दृष्टीने महत्त्वाचं ठरणार आहे. एकनाथ शिंदे यांचे 7 खासदार आहेत, तर शरद पवार गटाचे केंद्रात 8 खासदार आहेत. तर एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्रात आणि केंद्रात देखील गरज संपणार आहे.
गेल्या दीड वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिलेल्या शरद पवार आणि अजित पवार हा काका-पुतण्यातील वाद अखेर संपण्याची चिन्हं दिसत आहेत. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंना मोठा पुन्हा धक्का बसणार का, असा देखील प्रश्न उपस्थित होतोय. परंतु या भेटीमुळे पवार कुटुंबातील वाद संपल्याची चर्चा सुरु झालीय. तर दुसरीकडे अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेऊन भाजप नेतृत्त्वाला एक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे का, अशी चर्चा देखील रंगली आहे. शरद पवारांची भेट घेवून अजित पवार यांनी माझ्याकडे सर्व पर्याय खुले आहेत, असं दर्शवण्याचा प्रयत्न केलाय. अशी देखील चर्चा सुरू आहे.
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात भाजप पुन्हा एकदा ऑपरेशन लोटस राबवण्याच्या तयारीत असल्याचा दावा भाजपच्या ज्येष्ठ नेत्यानं केलाय. अजित पवार महायुतीचे घटक पक्ष आहेत. त्यामुळे शरद पवारांची भेट घेवून अजितदादांनी एखादा नवा डाव खेळलाय का? अशी देखील चर्चा राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात सुरू आहे.
अजित पवार(political updates) यांनी आज शरद पवार यांची घेतलेली भेट शंभर टक्के कौटुंबिक होती. राजकारण एकाबाजूला, विचार वेगळे असतील. पण कुटुंब म्हणून एकत्र आलं पाहिजे. 100 टक्के ही भेट कौटुंबिक होती, असं अजित पवार यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांनी म्हटलंय. पुढच्या वर्षी एखाद्या वेळी पाडवा आम्ही एकत्रित घेऊ, असं वक्तव्य देखील युगेंद्र पवार यांनी केलंय. तर रोहित पवार यांनी सुद्धा आजच्या भेटीवर सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. अजितदादा आणि त्यांच्यासोबत अनेक नेते शरद पवारांच्या भेटीला आले ही चांगली गोष्ट आहे, असं रोहित पवारांनी म्हटलंय.
परंतु अजित पवार आणि शरद पवार यांच्या आज 35 मिनिटे चाललेल्या बैठकीत नेमकं काय घडलं? हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. या बैठकीत नेमकी कोणती चर्चा झाली? हे मात्र आता पुढील काळातच स्पष्ट होणार आहे.
हेही वाचा :
CSMT जवळ बेस्ट बसने एकाला चिरडलं; जागीच मृत्यू
‘पुष्पा 2’ सुरू असतानाच चित्रपटगृहात तरुणाचा मृतदेह, तरीही सुरूच होता सिनेमा…
हरभजन सिंहचा व्हिडीओ पाहून चाहत्यांनी केला प्रेमाचा वर्षाव!