पवार साहेबांनी आर. आर. आबांच्या लेकावर टाकली पक्षाची मोठी जबाबदारी!

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला(political news) पराभवाचा सामना करावा लागला आहे. मात्र आता निवडणुकीनंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या गटनेतेपदाच्या निवडी संदर्भात एक बैठक पार पडली आहे. या बैठकी दरम्यान पक्षाच्या विधिमंडळ पक्ष नेता, गटनेता आणि मुख्य पतोदपदाबाबत चर्चा करण्यात आली झाली.

बैठकी दरम्यान राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या(political news) गटनेतेपदी आमदार जितेंद्र आव्हाड यांची निवड झाली आहे. तर मुख्य प्रतोदपदी तासगाव- कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित आर. आर. पाटील यांची निवड झाली आहे. याशिवाय प्रतोद म्हणून माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे आमदार उत्तम जाणकर यांची निवड करण्यात आली आहे. या बैठकीनंतर राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबतची अधिकृत घोषणा केली आहे.

आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने गटनेतेपदाची जबाबदारी दिली आहे. तर राष्ट्रवादीचे दिवंगत नेते, माजी गृहमंत्री आर. आर. आबांच्या लेकावर देखील पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे. त्यामुळे आमदार रोहित. आर. आर. पाटील यांची मुख्यप्रतोदपदी निवड करण्यात आली आहे. तर भाजप पक्षाच्या राम सातपुतेंना हरवत दणदणीत विजय मिळणाऱ्या उत्तम जाणकर यांच्यावर देखील प्रतोदपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे एकूण 10 उमेदवार निवडून आले आहेत. यापैकी नवनिर्वाचित आमदारांची बैठक मुंबई येथील कार्यालयात बैठक झाली आहे. या बैठकीनंतर राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत याबाबतची माहिती दिली आहे.

तसेच विधानपरिषदेचे आमच्या पक्षाचे सदस्य उपस्थित न झाल्यामुळे विधिमंडळ पक्षाच्या नेत्याबाबतीत लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याचं त्यांनी म्हंटल आहे. याशिवाय विधिमंडळाचं अधिवेशन सुरु असताना याबाबत बैठक होईल. त्यावेळी त्याबाबचा निर्णय घेतला जाणार असल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं आहे.

हेही वाचा :

12th Fail फेम अभिनेत्याच्या चाहत्यांना धक्का!

महिन्याच्या सुरुवातीलाच आनंदवार्ता! पेट्रोल-डिझेल ‘इतक्या’ रुपयांनी झालं स्वस्त?

क्रिकेट विश्वात शोककळा …भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेदरम्यान ‘या’ महान फलंदाजाचे निधन