ओटीटीचा वादग्रस्त रिऍलिटी शो बिग बॉस ओटीटी सिझन ३ सध्या चांगलाच(divorce) चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरात अनेक नवनवीन आव्हान पाहायला मिळत आहेत. मागील आठवड्यामध्ये नव्या वाईल्ड कार्डची एंट्री झाली आहे. त्यामुळे आता बिग बॉसचे घर आणखीनच मनोरंजक झाले आहे. काही स्पर्धक हे घराबाहेर झाले आहेत तर काही स्पर्धक हे अजूनही स्पर्धेमध्ये टिकून आहेत.

बिग बॉस ओटीटीमधील चर्चित स्पर्धक(divorce)अरमान मलिक बऱ्याचदा वादामध्ये दिसला आहे. तो या बिग बॉसच्या घरामध्ये त्याच्या दोन पत्नींसोबत घरामध्ये आला होता. त्याची पहिली पत्नी पायल मलिक आणि दुसरी पत्नी कृतिका मलिक असे दोघींची नावे आहेत. आता त्याच्या पहिल्या पत्नीने एक सत्य उघड केले आहे. त्यामुळे आता सोशल मीडियावर नवा चर्चेचा विषय मिळाला आहे.
अरमान मलिकची पहिली पत्नी पायल ही बिग बॉसच्या घराबाहेर तिसऱ्या आठवड्यामध्ये बाहेर पडली आहे. मात्र शोमधून बाहेर पडल्यानंतर तिला ट्रोलिंगला सामोरे जावे लागले. लोक तिला ट्रोल करत आहेत की ती अरमानला का सोडत नाही? सतत होणाऱ्या द्वेषाला कंटाळून पायलने ती अरमानला घटस्फोट देणार असल्याचे सांगितले आहे.
पायलने एक व्हिडीओ युट्युबवर शेअर केला आहे यामध्ये तिने उघड केले आहे की, या नाटकाला आणि द्वेषाला मी कंटाळली आहे. जोपर्यंत ते माझ्याबद्दल होते तोपर्यंत ते ठीक होते, परंतु आता ते माझ्या मुलांबद्दल आहे. हे धक्कादायक आणि घृणास्पद आहे. याच कारणामुळे मी अरमानपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. तो कृतिकासोबत राहू शकतो आणि मी मुलांची काळजी घेईन असे तिने सांगितले आहे.

पुढे ती म्हणाली की, मला माहित आहे की गोलू (कृतिका-अरमानची दुसरी पत्नी) जैदशिवाय राहणार नाही, त्यामुळे कदाचित ती त्याला तिच्याकडे ठेवेल आणि मी माझ्या तीन मुलांना घेऊन जाईन. लोक त्याच्या एकाधिक विवाहांमुळे आनंदी नाहीत आणि ते यापुढे द्वेष सहन करू शकत नाहीत. हे माझ्यासाठी खूप त्रासदायक आहे. एकतर आपण तिघे वेगळे आहोत किंवा दोघे वेगळे आहोत किंवा मी जाते असे तिने व्हिडिओमध्ये स्पष्ट केले आहे.
हेही वाचा :
तुम्हाला बाळ होईल तेव्हा मी…, लग्नाचा उल्लेख करत सलमानचं वक्तव्य
मगरीसोबतची मस्ती पडली महागात, जबडा उघडला आणि क्षणार्धात… Video Viral
सरकारची ‘लाडका मित्र’ योजना; मुंबईला अदानी सिटी करण्याचा डाव; ठाकरेंचा घणाघात