सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही व्हायरल होत असत. व्हायरल (curry)होण्यासाठी लोक वाटेल त्या थराला जातात. शुल्लक प्रसिद्धीसाठी लोक अनेक विचित्र गोष्टी करू पाहतात. सध्या तेलंगणातील एका युट्युबरनेही असेच काहीसे करण्याचा प्रयत्न केला मात्र यात तो शपशेल फेल झाल्याचे दिसून येत आहे. एका व्हिडिओसाठी केलेल्या पराक्रमाने त्याला थेट पोलीस स्टेशनचे दार पाहण्यास भाग पाडले आहे.
घटनेविषयी बोलणे केले तर झाले असे की, तेलंगणातील युट्युबर(curry) प्रणय कुमार याने आपल्या चॅनेलवर अधिक व्युज याव्यात यासाठी चक्क मोराच्या करीच्या रेसिपीचा व्हिडिओ शेअर केला. यानंतर हा व्हिडिओ प्रचंड वेगाने व्हायरल झाला. व्हिडिओला व्हायरल झाल्याचे पाहताच कोडम प्रणय देखील खुश झाला. मात्र त्याचा हा आनंद काही दिवसांपुरताच होता कारण त्याच्या कृत्याची माहिती मिळताच त्याला पोलिसांनी अटक केली. याचे कारण म्हणजे, मोर हा आपलय देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे आणि त्याला पकडणे किंवा मारणे बेकायदेशीर आहे.
यामुळेच आता पोलीस आणि वनविभागाने या यूट्युबरवर कारवाई केली आहे. वनविभागाने रविवारी प्रणय कुमारला अटक केली आणि त्याने करी बनवलेल्या भागाची पाहणी केली. प्रणयच्या रक्ताचे नमुने आणि उरलेली करी चाचणीसाठी पाठवण्यात आली असून, चाचणीत मोराचे मांस असल्याची खात्री पटल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असेही सांगण्यात आले आहे.
YouTuber Posts ‘Traditional Peacock Curry Recipe’ Video
— Sudhakar Udumula (@sudhakarudumula) August 11, 2024
A local YouTuber has sparked outrage after posting a controversial video titled “Traditional Peacock Curry Recipe” on his channel. The video, uploaded by Kodam Pranaykumar of Tangallapalli in Sircilla, has drawn widespread… pic.twitter.com/pQoWG1Ghrk
याप्रकरणी आता पोलिसांनी युट्युबरवर गुन्हा दाखल केला असून राजन्ना सिरसिल्ला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अखिल महाजन यांनी ट्वीट करत या प्रकरणाची माहिती दिलेली आहे. दरम्यान प्रणय कुमार यांनी यापूर्वीही ‘रानडुकराची करी’चा व्हिडिओ शेअर केला होता. अनेकजण याविषयी ऐकून आता थक्क होत आहेत आणि आपल्या धक्कादायक प्रतिक्रिया सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत.
हेही वाचा :
कोल्हापूर शहर हद्द वाढ दादा म्हणतात, होणे नाही!
मनु भाकर नीरज चोप्राशी लग्न करणार? वडिलांनी अखेर सौडलं मौन
राजपाल यादववर कर्जाचा डोंगर; बँकेकडून कोट्यवधींच्या संपत्तीवर जप्तीची कारवाई