इंडिया आघाडीची एक्पायरी डेट 4 जून आहे, असे विधान करणाऱया पंतप्रधान(pm) मोदींचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार समाचार घेतला.
‘तुमचा बुरशी आलेला माल आजवर लोकांनी पाहिला आहे. तो माल आम्ही 4 जूनला केराच्या टोपलीत फेकून देणार आहोत. तुमचं सगळंच बुरसटलेलं, गोमूत्रधारी आहे. अशी घाण लोपं नकोयत आम्हाला, असे ठणकावतानाच थापेबाज मोदी सरकार काहीही झाले तरी आम्ही परत येऊ देणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी आज ठणकावले. 5 जून उजाडेल तेव्हा दिल्लीत इंडिया आघाडीचे सरकार आलेले असेल, असा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.(pm)
जळगाव मतदारसंघातील महाविकास आघाडीचे शिवसेनेचे उमेदवार करण पवार आणि धुळे लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांच्या आज झंझावाती सभा झाल्या. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवला. भाजपवाले अगदी खालच्या पातळीवर जाऊन टीका करू लागले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर आईवडिलांनी संस्कार केलेत की नाहीत, असा प्रश्न आता देशातील जनतेला पडला आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
गेल्या निवडणुकांमध्ये शिवसेनेने मोदींसाठी मते मागितली होती. तेव्हा मोदींनी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर टीका केली होती. मनमोहन सिंग हे रेनकोट घालून आंघोळ करतात असे ते म्हणाले होते आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भटकती आत्मा म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊंच्या मातीत असे संस्कार कुणावरही होत नाहीत, असा पलटवार उद्धव ठाकरे यांनी मोदींवर केला.
सभेच्या व्यासपीठार महाविकास आघाडीचे उमदेवार करण पवार, श्रीराम पाटील, शिवसेना संपर्क प्रमुख संजय सावंत , सहसंपर्कप्रमुख (जळगाव लोकसभा) गुलाबराव वाघ, जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, डॉ. हर्षल माने, महानगरप्रमुख शरद तायडे, ललीता पाटील, वैशाली सूर्यवंशी, युवासेना जिल्हाप्रमुख निलेश चौधरी, माजी महापौर जयश्री महाजन, माजी उपमहापौरी कुलभूषण पाटील तर धुळे येथील सभेमध्ये व्यासपीठावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार कुणाल पाटील, माजी आमदार अनिल गोटे, शिवसेनेचे संपर्कप्रमुख अशोक धात्रक, सहसंपर्क प्रमुख हिलाल माळी, महेश मिस्तरी, माजी आमदार शरद पाटील यांच्यासह महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

इंडिया आघाडीचा विजय झाला तर पाकिस्तानला आनंद होईल, असे मोदी म्हणाले. मग नवाज शरीफांच्या घरी न बोलावताच केक खायला कोण गेले होते?
अत्याचारी रेवण्णाला खेचत आणून मोदींच्या गळ्यात बांधू
बुरसटलेले थापेबाज मोदी सरकार देशात पुन्हा येणार नाही, पण आलेच तर महिलांवर अत्याचार करून फरार झालेला प्रज्ज्वल रेवण्णा याला भाजपवाले सन्मानाने पेंद्रात बोलवतील, सत्कार करतील आणि महिला व बाल कल्याणमंत्री करतील, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. अत्याचारी, बलात्कारी, पॉर्न फिल्मवाला प्रज्ज्वल रेवण्णा आज फरार आहे. पण इंडिया आघाडीचे सरकार आल्यानंतर तो कुठेही असला तरी खेचत आणून मोदींच्या गळ्यात त्याची जबाबदारी बांधल्याशिवाय राहणार नाही. कारण त्याला मत म्हणजे मोदींना मत असे मोदी म्हणाले आहेत, असा स्पष्ट इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला.
हेही वाचा :
50 इंचाचा Smart TV 25000 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करण्याची संधी
सांगली काँग्रेसचीच असून काँग्रेसचीच राहणार; विशाल पाटील यांचं जनतेला पत्र
ठाकरेंची साथ सोडलेले माजी मंत्री आज शिंदे गटात प्रवेश करणार