कडक उन्हाळ्यासाठी परिपूर्ण झटपट बनवा पित्तशामक सोलकढी राहा ताजेतवाने आणि उत्साही

कोकणात उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये सोलकढी हे पेय (drink)आवडीने प्यायले जाते. सोलकढी हा पदार्थ सगळ्यांचं खूप आवडतो. उन्हाळयात सोलकढी प्यायल्यामुळे शरीराला थंडावा मिळतो. कोकमपासून बनवलेली सोलकढी शरीराला थंडावा देते. दुपारच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी जेवण केल्यानंतर सोलकढी प्यायल्यास जेवलेले अन्न व्यवस्थित पचन होते. याशिवाय बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी सोलकढी पिऊ शकता. सोलकढी बनवण्यासाठी कोकम आणि खोबऱ्याच्या रसाचा वापर केला जातो. उन्हात बाहेर जाऊन आल्यानंतर सोलकढी प्यायल्यास पोटात वाढलेली उष्णता कमी होईल आणि शरीर थंड राहील. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये कोकमचा वापर करून सोलकढी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने सोलकढी बनवल्यास चव अतिशय सुंदर लागेल. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

यंदाच्या वाळवणीत बनवा वर्षभर टिकणारी दही मिरची, जेवणात तोंडी लावण्यासाठी चमकचमीत पदार्थ
साहित्य:
कोकमचे आंबट सरबत
मीठ
ओलं खोबरं
हिरवी मिरची
लसूण
जिरं
सकाळच्या नाश्त्यात(drink) हेल्दी पदार्थ हवा आहे? मग सोप्या पद्धतीमध्ये स्वादिष्ट अन् पौष्टिक बीट सँडविच

कृती:
सोलकढी बनवण्यासाठी सर्वप्रथम, ओलं खोबरं किसून घ्या. त्यानंतर त्यात बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची टाका.
मिक्सरच्या भांड्यात ओल्या खोबऱ्याचा किस, हिरवी मिरची, (drink)लसूण पाकळ्या आणि जिरं टाकून त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून बारीक वाटा.वाटून झाल्यानंतर कॉटनच्या कापडावर तयार करून घेतलेले मिश्रण ओतून घट्ट पिळून त्यातील खोबऱ्याचा रस काढा.रस काढून झाल्यानंतर उरलेला ओल्या खोबऱ्याचा किस मिक्सरच्या भांड्यात टाकून पुन्हा एकदा पाणी टाकून बारीक वाटा.

वाटून झाल्यानंतर वरील पद्धतीने रस काढा.
खोबऱ्याच्या रसात २ चमचे कोकमचे आंबट आगळ टाकून मिक्स करा. त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ टाका.
सगळ्यात शेवटी सोलकढीची चव वाढवण्यासाठी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून मिक्स करा.
तयार आहे उन्हाळ्यासाठी बनवलेली पित्तशामक सोलकढी.

हेही वाचा :

रोहित शर्माच्या कर्णधारपदावर मोठा निर्णय…

कोल्हापूर-सांगली महामार्ग बंद करण्याचा इशारा, राजू शेट्टींच्या घरी पोलिस पोहोचले

इतका माज येतो कुठून? मद्यधुंद अवस्थेत तरुणाने चौघांना उडवलं Video Viral

ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान विजय वर्मा- तमन्ना भाटिया यांनी रवीना टंडनच्या घरी साजरी केली होळी; Video Viral

सरकारचा मोठा निर्णय! तुमच्या भागातील दारुचे दुकान बंद करायचे असेल तर मतदान करता येणार

भारत-चीन सीमेवर कोल्हापुरच्या जवानाला वीरमरण, सहा महिन्याच्या चिमुकल्याची भेट अपूर्णच